Wednesday, 9 January 2013

धुळे दंगलीची सखोल चौकशी करणार -गृहमंत्री



मुंबई, दि. 9 : धुळे येथे झालेल्या दंगलीची सरकारला खोलात जाऊन चौकशी करायची असून अपर पोलीस महासंचालक जावेद अहमद यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
            महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गृहमंत्री श्री. पाटील यांची भेट घेऊन धुळे दंगलीच्या संदर्भात चर्चा केली. कामगार मंत्री हसन मुश्रीफ, बाबा हाश्मी आदी यावेळी उपस्थित होते.
गृहमंत्री श्री. पाटील म्हणाले, किरकोळ कारणावरुन धुळे येथे दंगल झाली असून यात
6 लोकांचा बळी गेला आहे तर अनेक नागरिक आणि पोलीस जखमी झाले आहेत. दंगलीत नुकसान झालेल्यांना आर्थिक सहाय करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा केली असल्याचेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
धुळ्यात झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती असे अद्यापपर्यंत कुठेही आढळले नसून किरकोळ कारणावरुन ही दंगल झाल्याचे सांगून या दंगलीत झालेल्या गोळीबाराची न्यायदंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे. दंगलग्रस्त भागातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून एका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात फक्त संचारबंदी लागू करण्यात आली असून जनतेने पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही गृहमंत्री श्री. पाटील यावेळी केले.

No comments:

Post a Comment