मोर धरणातून सिंचनासाठी पाणी अर्ज करावे
जळगांव, दि. 12 :- मोर मध्यम प्रकल्पाचे मुख्य कालव्याचे विमोचक व जलाशय
मधून सिंचनाने पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणा-या सर्व लाभधारकांना सन 2011-12 या वर्षात
रब्बी हंगाम दिनांक 1 नोव्हेंबर 2012 ते 28 फैब्रुवारी 2013 या मुदतीत रब्बी
पिकांसाठी (पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरिक्त) मोर मध्यम प्रकल्पांतर्गत उपलब्ध
होणा-या जलसंपत्तीच्या साठयातून सिंचनासाठी लाभ देण्याचे नियोजन आहे. तरी लाभधारकांनी आपले पाणी अर्ज विहित नमुन्यात भरुन
7/12 उता-यासह संबंधीत उपविभागात दिनांक 21 नोव्हेंबर 2012 पर्यत वा तत्पूर्वी
कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर समक्ष दयावेत . व खाते पुस्तिका प्रत्यक्ष संबंधीत उपविभागात
दाखवून पाणी अर्जावर नोंद घेण्याची कार्यवाही करावी. मोर माध्यम प्रकल्प मुख्य
कालव्याच्या विमोचकावर व जलाशयातून गहू, हरबरा, हायब्रीड दूरी, कपाशी, इतर भुसार
पिके, रब्बी पिके इत्यादीसाठी पाणी अर्ज करावेत
उपरनिर्दिष्ठीत पिकांशिवाय पिकांना मागणी केल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार
मंजूरी देण्यात येईल. सिंचनाच्या पाणी पुरवठयासाठी खालील अटी व शर्ती राहतील.
मंजूर क्षेत्रात मंजूर पिकासच पाणी घ्यावे लागेल. प्रत्यक्ष पिक लागवड पास
मिळाल्याशिवाय करता येणार नाही. पाणी पुरवठा शेतचा-या अदयावत न झाल्याने सिंचनाचा
लाभ घेऊ इच्छिणा-या शेतक-यांना तात्पुरते स्वरुपात विमोचकापासून शेवटपर्यत पाणी
नेणेसाठी शेतचारी करुन घ्यावी लागेल. मंजूरी ही पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र
राज्य ) 1976 व प्रचलीत शासन नियमाचे तरतूदीचे अधिन राहील. पाणीपटटीचे सुधारीत दर
नियमानुसार लागू झाले आहेत. व सवलतीचे पिके व पाणीपटटी लागू असलेल्या पिकांवर शासनाचे
नियमानुसार कर आकारण्यात येईल. पाणीसाठा उपलब्ध झाला तरच सिंचनासाठी पाणी पुरवठा
करता येईल. असे कार्यकारी अभियंता जळगांव मध्यम प्रकल्प विभाग, जळगांव यांनी कळविले आहे.
*
* * * * *
मंगरुळ धरणातून सिंचनासाठी पाणी अर्ज करावे
जळगांव, दि. 12 :- मंगरुळ मध्यम प्रकल्पाचे
मुख्य कालवा व के-हाळे क्र. 1 व 2 पुच्छ
वितरीका व पुच्छ वितरीका मधून सिंचनाने
पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणा-या सर्व लाभधारकांना सन 2012-13 या वर्षात रब्बी हंगाम
दिनांक 1 नोव्हेंबर 2012 ते 28 फैब्रुवारी 2013 या मुदतीत रब्बी पिकांसाठी
(पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरिक्त) मंगरुळ मध्यम प्रकल्पांतर्गत उपलब्ध
होणा-या जलसंपत्तीच्या साठयातून सिंचनासाठी लाभ देण्याचे नियोजन आहे. तरी लाभधारकांनी आपले पाणी अर्ज विहित नमुन्यात
भरुन 7/12 उता-यासह संबंधीत उपविभागात दिनांक 20 नोव्हेंबर 2012 पर्यत वा
तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर समक्ष दयावेत .व खाते पुस्तिका प्रत्यक्ष संबंधीत उपविभागात
दाखवून पाणी अर्जावर नोंद घेण्याची कार्यवाही करावी. मंगरुळ माध्यम प्रकल्प मुख्य
कालव्या व के-हाळे वितरीका क्र. 1 व 2,
पुच्छ उपवितरीका भाजीपाला, मका, कपाशी,
ज्वारी, बाजरी, चारा व इतर सर्व रब्बी पिके व भुसार पिके, इत्यादीसाठी पाणी अर्ज करावेत
उपरनिर्दिष्ठीत पिकांशिवाय पिकांना मागणी
केल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. सिंचनाच्या पाणी
पुरवठयासाठी खालील अटी व शर्ती राहतील.
मंजूर क्षेत्रात मंजूर पिकासच पाणी घ्यावे
लागेल. प्रत्यक्ष पिक लागवड पास मिळाल्याशिवाय करता येणार नाही. पाणी पुरवठा
शेतचा-या अदयावत न झाल्याने सिंचनाचा लाभ घेऊ इच्छिणा-या शेतक-यांना तात्पुरते
स्वरुपात विमोचकापासून शेवटपर्यत पाणी नेणेसाठी शेतचारी करुन घ्यावी लागेल. मंजूरी
ही पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र राज्य ) 1976 व प्रचलीत शासन नियमाचे तरतूदीचे
अधिन राहील. पाणीपटटीचे सुधारीत दर नियमानुसार लागू झाले आहेत. व सवलतीचे पिके व
पाणीपटटी लागू असलेल्या पिकांवर शासनाचे नियमानुसार कर आकारण्यात येईल. पाणीसाठा
उपलब्ध झाला तरच सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येईल. असे कार्यकारी अभियंता जळगांव
मध्यम प्रकल्प विभाग, जळगांव यांनी कळविले
आहे.
No comments:
Post a Comment