Monday, 17 September 2012

आधार ओळखपत्रात समाविष्ट बाबींसंदर्भात मुख्य सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा



          मुंबई, दि. 17 : आधार ओळखपत्रात समाविष्ट असलेल्या वित्तविषयक बाबींसंदर्भात मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांनी आज अमरावती, नागपूर विभागीय आयुक्त तसेच वर्धा, नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.
            मंत्रालयात सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या व्हि‍डिओ कॉन्फरन्सिंगमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे यांनी सहभाग घेतला. आधारकार्डच्या माध्यमातून आपापल्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी कार्डधारकांचे बँक खाते उघडण्याबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. या कामाला गती द्यावी त्याचबरोबर संबंधित बँकांसोबत चर्चा करावी असे मुख्य सचिवांनी सांगितले.

No comments:

Post a Comment