मुंबई,
दि. 14 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय
निर्मिती पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार स्पर्धेसाठी 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च
2012 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत.
पुरस्कारासाठीची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या कार्यालयात तसेच मुंबई वगळता राज्याच्या सर्व
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) येथे
विनामुल्य 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2012 या कालावधीत उपलब्ध आहेत. तसेच
महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीनतम संदेश या
शीर्षकाखाली प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहेत. संकेतस्थळावरील प्रवेशिकांचाही वापर करुन त्या
संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. पूर्ण भरलेल्या प्रवेशिका लेखकांनी
आवश्यक साहित्यासह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई कार्यालयात 15 ऑक्टोबर 2012
पर्यंत पाठवाव्यात.
लेखक, प्रकाशक यांच्या खेरीज अन्य
व्यक्तीही या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. तथापि अशा प्रकारे शिफारस
करणाऱ्या व्यक्तीने प्रवेशिकेसोबत पुस्तकाच्या दोन प्रती, लेखकाची वैयक्तिक माहिती
व लेखकाची दोन छायाचित्रे पाठविणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा निकाल जाहीर
होण्यापूर्वी संबंधित लेखकाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन नंतरच
स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल. अशी पुस्तके स्वीकारणे, त्यांचा वाङ्मय प्रकार निश्चित करणे याबाबत
अंतिम निर्णय हा परिक्षण समितीचा राहिल.
मुंबईतील लेखक/प्रकाशकांनी तसेच
शिफारस करणाऱ्या अन्य व्यक्तींनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील
प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर
इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी रोड,
प्रभादेवी, मुंबई-400025 येथे पाठवाव्यात. मुंबई वगळता अन्य ठिकाणच्या
लेखक/प्रकाशकांनी तसेच शिफारस करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित जिल्हाधिकारी
कार्यालयामध्ये हे साहित्य 15 ऑक्टोबर 2012 पर्यंत पाठवावे, अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक 24325929/31 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र
राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment