मुंबई, दि. 25 : जागतिक बँकेचा अहवाल तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय
स्तरावर पुरविण्यात येणाऱ्या सेवा यासाठी केलेल्या शिफारशींचा पाणी पुरवठा व
स्वच्छता विभागाने महसुली आराखडा (रेव्ह्युन्यु मॉडेल) तयार करावा, असे निर्देश
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
यासंबंधी विधानभवनात जागतिक बँकेचे पाणी
व स्वच्छता तज्ज्ञ विल्यम किंगडम, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ स्मिता मिश्रा, जागतिक बँकेचे
भारतातील संचालक ओन्नो रुहल यांच्या उपस्थितीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर
पुरविण्यात येणाऱ्या सेवा विषयी सादरीकरणात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, राज्यमंत्री रणजित
कांबळे, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार
जैन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, नगर विकास विभागाचे
प्रधान सचिव श्रीकांत सिंह तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (मुंबई) चे
वरिष्ठ सल्लागार वासुदेव गोरडे, उपसचिव दु. र. चंद्रिकापुरे तसेच अन्य अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
या
सादरीकरणात महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेची भागीदारी, महाराष्ट्र स्वच्छता व
पाणी पुरवठा धोरणे सुजल निर्मल महाराष्ट्र अभियान, बिल्डींग ऑपरेशनल कॅपॅसिटी,
महाराष्ट्र स्वच्छता व पाणी पुरवठा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लान,
महाराष्ट्र शासनाच्या समर्थनार्थ संभाव्य कार्यक्रम इत्यादी मुद्यांवर चर्चा
करण्यात आली.
No comments:
Post a Comment