Monday, 10 September 2012

यापुढे औषधविक्री रजिष्टर्ड फार्मासीस्टच्या देखरेखी खाली होणे अनिवार्य : अन्न व औषध प्रशासन


जळगांव, दि. 10 :- जिल्हयातील सर्व औषध विकेत्यांनी औषधे सौंदर्य प्रसाधनेकायदा 1940 त्या अंतर्गत नियम 1945 मधील नियम 65 (2) नुसार औषध विक्री ही रजीष्टर्ड फार्मासिस्ट च्याच हजेरीत समक्ष करण्याची तरतुद आहे. तसेच औषध दुकानांचे जागेत औषध विक्रीसाठी परवानगी देतांना मुळ व्यवसाय औषध विक्री धरुन  परवानगी दिली जाते. सदर जागेत औषध वगळुन इतर वस्तुंची विक्री ही गौण धरली जाते. त्यामुळे त्या दुकानातुन होणारा औषध व्यवसाय हा पुर्ण पणे रजीष्टर्ड फार्मासिस्ट च्याच देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. जर रजीष्टर्ड फार्मासिस्ट नसेल तर दुकान मालकाने दुकान बंद करुन ठेवावे. जेणेकरुन रजीष्टर्ड फार्मासिस्टच्या गैरहजेरीत औषधाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. औषध निरीक्षक दुकानात आल्यानंतर आम्ही औषध विक्री करीत नाही ही सबब चालणार नाही अन्यथा त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची सर्व औषध विक्रेत्यांनी नोंद घ्यावी असे सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
 
* * * * * * * * * 
²ÖÖŸÖ´Öß ÜÖÖ¡Öß“Öß . . .  ´ÖÖׯüŸÖß ¯ÖÏÝÖŸÖß“Öß . . . ¾Öê¬Ö ³Ö×¾ÖµÖÖ“ÖÖ . . .

No comments:

Post a Comment