जळगांव, दि. 13 :- राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता येथील शासकीय विश्रमागृह पद्मालय येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यांत आले आहे. या जनता दरबार कार्यक्रमास जिल्हयातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा .
* * * * * * *
No comments:
Post a Comment