जळगांव,
दि. 27 :- लोकराज्य मासिकामधील माहिती
साहित्य विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त असल्याने प्रत्येक शाळा,
शिक्षक व विद्यार्थी यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार व्हावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
शशिकांत हिंगोणेकर यांनी भुसावळ येथील सेंट आलायसेस हायस्कूलच्या सभागृहात आयोजित
मुख्यध्यापकांच्या सहविचार सभेत केले.
यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत
परीक्षा नाशिक मंडळाचे विभागीय सचिव भगवान
सुर्यवंशी, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी एल. जी. सोनवणे, एस. ई चौधरी, सेंट
अलायसेस हायस्कूलच्या मुख्याध्यापीका सिस्टर अल्फासो, सेंट अलायसेस संस्थेच्या
अध्यक्षा सिस्टर फिल्डा जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे आदि उपस्थित होते.
लोकराज्य अंकामधील माहिती वाचून आपल्या
ज्ञानात भर पडत असल्याने सर्व शिक्षक वर्गाने लोकराज्य अंकाचे सातत्याने वाचन केले
पाहिजे तसेच विद्यार्थ्यानीही लोकराज्य अंकाबद्दल मार्गदर्शन केल्यास भविष्य काळात
त्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षा देताना लोकराज्य मासिक हे एक
मार्गदर्शक ठरेल असे श्री. हिंगोणेकर यांनी
सांगितले.
लोकराज्य अंकामध्ये प्रसिध्द होणा-या विविध योजना,
यशकथा आदिबरोबरच लोकराज्य मासिकाचे मराठी भाषा, चित्रलिपी, शेती, ग्रंथ वाचन,
शिक्षण आदि विषयावरील विशेषा अंकाची
माहिती जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे यांनी उपस्थिंना करुन दिली. तसेच
लोकराज्य मासिक शिक्षक व विद्यार्थ्याकरिता अत्यंत उपयुकत असलयाने त्यांनी
लोकराज्याचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन
श्री. वसावे यांनी केले.
प्रारंभी लोकराज्य मासिकाचा जुलै 2012 चा
शिक्षण विषयक विशेषांक रजेसिंग वसावे यांनी विभागीय सचिव भगवान सुर्यवंशी व
शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी भेट म्हणून दिला.
सदरच्या कार्यशाळेच्या ठिकाणी जिल्हा माहिती
कार्यालयाचा लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आलेला होता. या स्टॉलला
मुख्याध्यापकांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद
दिला व लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदारही बनविले.
0000
No comments:
Post a Comment