Monday, 23 July 2012

तालुक्यात राष्ट्रीय पिक विमा योजना लागू


चाळीसगांव दि.23 : नैसर्गिक आपत्ती, किड रोग कारणांमुळे पिकांचे नुकसान   झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू खरीप हंगामात सन 2012-13 या वर्षाकरिता राष्ट्रीय पिक विमा योजना लागू केली आहे.
तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या शेतक-यांसाठी राष्ट्रीय पिक विमा योजना लागू करण्यात आली असून सन 2012-13 च्या खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, भुईमुग, तीळ, सोयाबीन, सुर्यफुल, कांदा, मका, कापुस, उस इ. पिकांचा समावेश करण्यात आला आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे वरील पिकांचे उत्पन्न कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. वरील पिकांचा विमा काढल्यास शेतक-यांना फायदा होऊ शकतो. तसेच खरीप हंगामात शेतक-यांनी अतिरीक्त क्षेत्रासाठी पिक विमा काढल्यास अधिक फायदा होऊ शकतो. तरी शेतक-यांनी सदर पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळ स्तरावर मंडळ कृषि अधिकारी कृषि पर्यवेक्षक तसेच गांव पातळीवर कृषि सहाय्यक कृषि सेवक यांच्याशी संपर्क साधावा.  सदर पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै, 2012 पर्यंत असून या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, चाळीसगांव यांनी एका प्रसिध्द्ी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * *
वृत्त विशेष                                                                       दिनांक : 23.07-2012

उप माहिती कार्यालयाची ब्लॉग सेवा कार्यान्वित

       चाळीसगांव दि.23 : माहिती जनंसंपर्क महासंचालनालयाच्या अधिपत्याखालील उप माहिती कार्यालय, चाळीसगांव या कार्यालयामार्फत शासनाच्या प्रचार प्रसिध्द्ीचे कामकाज सुरु असते. बदलत्या आधुनिक युगाप्रमाणे या कार्यालयानेही आपले प्रचार प्रसिध्द्ीचे साहित्य प्रसार माध्यमांपर्यंत सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी ब्लॉग सेवा सुरु केली असून त्याचा पत्ता हा  www.siochalisgaon.blogspot.in  असा असून या ब्लॉग वर मुंबई मुख्यालय, जिमाका जळगांव सह स्थानिक बातम्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरमहा दिनांकानिहाय बातम्या हया सदर संकेतस्थळावरून प्रसार माध्यमांना युनिकोड फाँट सुविधेमध्ये उपलब्ध असून सर्व प्रसार माध्यमांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उप माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे प्रसार माध्यमांनी आपला ई-मेल पत्ता मोबाईल क्रमांक हे उप माहिती कार्यालयास कळविण्याची विनंती देखील केली आहे.
* * * * *

No comments:

Post a Comment