Friday, 20 July 2012

मातंग समाजातील व तत्सम पोट जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी

जळगांव, दि. 19 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जळगांव मार्फत दर वर्षा प्रमाणे या वर्षी सुध्दा सन 2012 - 13 या शैक्षणिक वर्षासाठी मातंग समाज तत्सम पोट जातीतील मांग , गारोळी, मातंग , मादिग, दानखणीमांग, मांगमदारी, मदारी, राधेमांग, मांगगारोळी, मांग, या समाजातील विदयार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्यांना महामंडाळाच्या जेष्ठा गुणानुक्रमानुसार उपलब्ध निधीतून अण्णाभाऊ साठे वार्षिक शिष्यवृत्ती देणात येणार आहे.
            सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी , 12 वी, पदवी , पदव्युत्तर , वैद्यकीय अभियात्रिकी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरतांना ती कागद पत्रे, गुणपत्रके, पुढील वर्गात प्रवेश घेतल्या बाबतच्या पुराव्यासह इतर कागदपत्रासह महामंडळाच्या जिल्हा कार्यालय जळगांव येथे संपर्क साधावा असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जी.जी.येरपवार यांनी कळविलेले आहे.
                                                                                                0 0 0 0 0

No comments:

Post a Comment