चाळीसगांव दि.22:- येथील अंधशाळेत सन 2012-2013 या शैक्षणिक वर्षाकरीता 06 ते 12 वर्षे वयोगटातील अंध मुलामुलींना प्रवेश देणे सुरु आहे. या शाळेत मोफत जेवण, निवास व शिक्षणाची व्यवस्था आहे.
या शाळेत प्रवेश घेण्याकरीता अंध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील त्रिस्तरीय प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, पालकाचा उत्पन्नाचा दाखला, अंध व्यतिरिक्त इतर अपंगत्व नाही. तसेच इतर आजार नाहीत याचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र आणि अंध मुला-मुलींचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो इ. कागदपत्रांची पुर्तता करुन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम यांचेशी 02589-22346, मो. 8308279115 या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा, असे अंध शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment