जळगाव, दि. ४ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हयातील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत शासन निर्णय क्रमांक गोखानि/10/0325/प्र.क्र.80/ख दोन दि. 23 में 2025 नुसार जळगाव जिल्हयात पर्यावरणपूरक व यांत्रिक पध्दतीने M-Sand उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेता खालील अटी व शर्तोंच्या अधीन राहुन M-Sand प्रकल्प उभारणीस इच्छुक उद्योजक, संस्था अथवा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक बाबी आहेत.
1. प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप व उदिष्ट
2. प्रकल्पासाठी सुचविलेल्या जागेचे वितरण व भू-संपत्ती बाबतचे कागदपत्र.
3. पर्यावरण परवानगी व संबंधित यंत्रणाकडून आवश्यक अनुमती.
4. यांत्रिक उपकरणे, प्रक्रिया व वार्षिक उत्पादन क्षमतेची माहिती.
5. संस्थेची आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र
6. मागील संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशिल.
इतर अटी-
1. शासन निर्णय दि. 23 में 2025 मधील नियम व मार्गदर्शक तत्वे लागू राहतील.
2. अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.
3. अंतिम निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे राहतील.
तरी, वरीलप्रमाणे सर्व बाबींची तसेच अटींची पुर्तता करून सदर प्रस्ताव आपले तालुक्यातील तहसीलदार /उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. असे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.