Thursday, 14 March 2024

असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ; जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

 असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ;  जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

जळगाव, दिनांक 14 मार्च, 2024 (वृत्तसेवा जिमाका) :

जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ठिकाणी जावून त्यांनी परीक्षा दयावयाची आहे. जिल्हयातील एकूण 57608 नव साक्षर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. त्यापैकी स्त्रियांची संख्या ही 41253, पुरुष संख्या ही 16349 व 06 ट्रान्सजेंडर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. सदर कार्यक्रमात केंद्रसरकार पुरस्कृत असून, यात मोठया संख्येने सर्व नव साक्षर व्यक्तीने उपस्थित राहून, परीक्षा दयावी असे आवाहन, शिक्षणाधिकारी  (माध्य) जिल्हा परीषद कल्पना चव्हाण यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0

‘यशवंत पंचायत राज’ व ‘अमृत महा आवास अभियान’ पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संपन्न अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त

    ‘यशवंत पंचायत राज’ व ‘अमृत महा आवास अभियान’ पुरस्कार वितरण  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संपन्न

अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त


नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (विमाका वृत्तसेवा):

विभाग स्तर व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीं साठी ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत सन 2020-21, 2022-23 कालावधीत अत्युकृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ‘अमृत महा आवास अभियान’तही चांगले काम करुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांचा सन्मान श्री.गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला  संपन्न झाले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘अमृत महा आवास अभियान’व ‘यशवंत पंचायत राज’  पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अर्जुन गुंडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपायुक्त ( विकास) उज्ज्वला बावके, महसूल प्रबोधनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ, सहा आयुक्त मनोज चौधर,  प्रकल्प संचालक, गटविकास  अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच , पुरस्कार प्राप्त संस्था व पुरस्कार्थी उपस्थित होते.

अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक व राज्य पुरस्कृत योजनेत ही प्रथम क्रमांक मिळाला अहमदनगर जिल्ह्यास बारा मानांकनात एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विशेष कौतुक केले.

पुरस्कार:
यशवंत पंचायत राज अभियान राज्य स्तर पुरस्कार सन 2022-23
अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहता येथील पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाचे रुपये 15 लाखाचे बक्षिस मिळाले.

यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2020-21
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, नाशिक द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, कळवण जि.नाशिक तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख

यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2022-23
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, पारोळा जि.जळगाव द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, संगमनेर जि.अहमदनगर तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख

गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2019-20
प्रदीप काशिनाथ वर्पे,सहायक लेखाधिकारी, जि.प.अहमदनगर, श्री. एकनाथ ढाकणे, ग्रामविकास अधिकारी, जि.प.अहमदनगर, अजय चौधरी, आरोग्य पर्यवेक्षक, जि.प.जळगाव, श्री. समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी, पं.स.राहाता. जि.अहमदनगर, . इंद्रसिंग राजपूत, विस्तार अधिकारी,सांख्यिकी, जि.प.नंदूरबार, अंबादास पाटील वरिष्ठ सहायक, जि.प.नाशिक

गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2020-21
 मनोज आहिरराव, वरिष्ठ सहायक, जि.प.नंदूरबार., विलास बोंडे विस्तार अधिकारी,सांख्यिकी, जि.प.जळगाव, . सतिष सिसोदे, शाखा अभियंता, जि.प. जळगाव, . अशोक कदम, वरिष्ठ सहायक, जि.प.अहमदनगर, प्रदीप आहिरे, वरिष्ठ सहायक, जि.प.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: धुळे जिल्हा

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.पाथर्डी जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.जामनेर, जि.जळगाव
तृतीय क्रमांक: ता.कर्जत जि.अहमदनगर


प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं. मालेवाडी  ता.पाथर्डी  जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.कुशेगाव ता.इगतपुरी, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. नागोसली, ता.इगतपुरी, जि.नाशिक

विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. हनुमंत खेडे, ता.धरणगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. भोलाणे, ता.पारोळा, जि. जळगाव
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. सुपे, ता.कर्जत, जि.अहमदनगर

विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अपार्टमेंट)
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. उपखेड, ता.चाळीसगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. वागदरी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. कोळपिंपरी, ता.पारोळा, जि.जळगाव

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता. जामनेर. जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ता.निफाड, जि. नाशिक
तृतीय क्रमांक: ता.नांदगाव, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: नंदूरबार जिल्हा

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.जामखेड  जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.शेवगाव, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ता.नेवासा, जि. अहमदनगर

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.अरणगाव ता.जामखेड  जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.गोलेगाव, ता.शेगाव जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.नागापूर, ता.नांदगाव, जि.नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता.ईगतपुरी जि.नाशिक
द्वितीय क्रमांक: ता.बागलाण, जि. नाशिक
तृतीय क्रमांक:  ता.जळगाव, जि.जळगाव
 
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.निंभारा, ता.धरणगाव,  जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.शिरसगाव, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.अंतापूर, ता.बागलाण, जि.नाशिक
 
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अर्पामेंट)
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.नांदगाव, जि.अहमदनगर
0 0 0 0 0

Wednesday, 13 March 2024

कृषी विभागांतर्गत स्मार्ट व आत्मा आयोजित केळी पीकाबाबत सुसंवाद कार्यक्रम संपन्न

             कृषी विभागांतर्गत स्मार्ट व आत्मा आयोजित केळी पीकाबाबत सुसंवाद कार्यक्रम संपन्न

जळगाव, दिनांक 13 मार्च ( जिमाका वृत्तसेवा )

 बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 12 मार्च 2024 रोजी परिश्रम हॉल, जळगाव येथे केळी पीक उत्पादन तंत्रज्ञान व बाजार माहिती संमेलन ( टेक मार्केट मीट)  व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव याचे मार्फत करण्यात आले होते.

या संमेलनासाठी  सुनील वानखेडे, विभागीय नोडल अधिकारी, स्मार्ट नाशिक, डॉ. के बी पाटील शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन, जळगाव,  सदानंद महाजन, भागवत पाटील अध्यक्ष केळी  उत्पादक महासंघ, डॉ. बी.डी.जडे, रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव, कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव, नाबार्डचे,  श्रीकांत झांबरे, अनिल भोकरे तसेच, निर्यातदार, खरेदीदार, केळी पीक उत्पादक प्रगतीशील शेतकरी, बैंक अधिकारी तसेच जिल्हाभरातून केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

केळी पिकाच्या मूल्य साखळी मधील सध्याची परिस्थिती व त्यामध्ये अपेक्षित बदल सुचविण्यासाठी सर्व संबंधितांना एकच मंचावर बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविशंकर चलवदे यांनी केले. त्यावेळी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हयाच्या प्रगती बाबत माहिती दिली. सुनील वानखेडे यांनी आपले मार्गदर्शनात स्मार्ट प्रकल्पाच्या बाबींविषयी विस्तृत महिती दिली. तसेच संमेलनात सहभागी सर्वांचे वेगवेगळे गट तयार करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांनुसार प्रस्तावित  मूल्य साखळी कशी असावी, याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. किरण जाधव सोलापूर यांनी जिल्ह्यात केळी लागवड 7 X 5 फुटावर करण्याचे फायदे व आलेले उत्पादन याविषयी माहिती दिली. तसेच केळी पिकासाठी मल्चिंग बेडवर लागवड, फर्टिगेशन शेड्युल प्रमाणे खत देणे व घड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

केळी निर्यातीमधील जळगाव जिल्हयातील सध्या स्थिती व संधी याविषयी विशाल अग्रवाल यांनी माहिती दिली. यावेळी केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनात,  कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादीची व्यवस्था जिल्हयात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निर्माण झाल्यास केळी 45 दिवसापर्यंत टिकवून ठेवता येणे शक्य आहे व आंतरराष्ट्रीय बाजारात जळगाव चे  अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यापक संधी आहे, रेल्वे वॅगन मधून केळी वाहतूक ही आता जवळपास बंद झालेलो आहे, देशांतर्गत विक्रीमध्ये सुद्धा बॉक्स रेट पॅकिंग करून केळी विकली जात आहे, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी अवगत केले तरच जळगावच्या केळीची  वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकवून ठेवणे शक्य आहे असे सांगितले. निर्यातदारांची सोलापूर जिल्ह्यातील केळीला पसंती ही त्यांच्या क्वालिटीमुळे व वाहतूक खर्चातील बचतीमळे आहे. 

जिल्हयातील निर्यात वाढविण्यासाठी वाहतूक खर्च दर दोन रुपयांनी कमी करून तडजोड करता येईल, तरीदेखील उत्पादक शेतक-यांना त्याचा लाभ होऊ शकतो. मागील वर्षी इतिहासात कधी नव्हे 32 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला परंतु हा देखील भविष्यातील संधी बघता निम्म्यापेक्षा कमी आहे.

शेतक-यांनी इतर घटकांकडून अपेक्षा व्यक्त करताना जिल्ह्यात ड्राय पोर्ट व्हावा, केळीचा बेबी फूड म्हणून समावेश करावा, केळी  घड व्यवस्थापनासाठी शासनामार्फत अनदान मिळावे, केळी खाणे विषयी जनजागृती पर जाहिराती प्रसिद्ध व्हाव्या, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी एखादा देश टार्गेट करून चार-पाच गावे मिळून व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून नियोजन व्हावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. प्रकल्प उपसंचालक आत्मा पा. फ साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादाराव जाधवर नोडल अधिकारी स्मार्ट जळगाव यांनी केले.

                                                                0 0 0 0 0

शहरातील सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणाऱ्या 27 जणांवर कायद्याने गुन्हे दाखल ▪ 27 जणांकडून पाच हजार शंभर एवढा दंड वसूल

                 शहरातील सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणाऱ्या 27 जणांवर कायद्याने गुन्हे दाखल

                        27 जणांकडून पाच हजार शंभर एवढा दंड वसूल


जळगाव, दिनांक 13 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) : 

शहरातील सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील 27 जणांवर गुन्हे दाखल करत 5 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला. जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा – 2003 (COTPA2003) या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हि मोहीम रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक स्थापित करण्यात आले आहे. या पथकाचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील आहेत. या भरारी पथकात दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी, पोलीस विभागामार्फत श्री. प्रदीप सिरसाळ पाटील व श्री. शिदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. यांचे प्रतिनिधी कु. निशा कटरे सायकॉलॉजीस्ट, आरोग्य अधिकारी म.न.पा. यांचे प्रतिनिधी डॉ. विकास पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, शरद पवार, विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांचा समावेश होता.

                                                                        0 0 0 0

Tuesday, 12 March 2024

१८ मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

                                 १८ मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

जळगाव, दिनांक १मार्च (जिमाका वृत्तसेवा) : 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.असे महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले.

                                                                 0 0 0 0 0

Monday, 11 March 2024

* दुचाकीसाठी पसंतीच्या क्रमाकांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन *

                      दुचाकीसाठी पसंतीच्या क्रमाकांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जळगाव, दिनांक 11 मार्च वृत्तसेवा जिमाका ) : 


दुचाकी वाहनांच्या क्रमांकाची नवीन नोंदणी एमएच-19/ईके-0001 ते 9999 ची मालिका सुरू करण्यात येणार आहे. नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास 13 व 14  मार्च, 2024 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे सादर करावा. वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलंग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

सदर आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर सदर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी.  पावतीची विधीग्राह्यता ही फक्त 30 दिवस नोंद घेण्यात यावी.

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास क्रमांकाच्या बाबतीत 15 मार्च, 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष/धनादेश स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल. उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील, असे ही श्री.लोही यांनी कळविले आहे.

0000000

* वन विभागाकडून कारवाई ; देवझिरी वनक्षेत्रात झाडाची चोरी करणाऱ्यास एकास वन कोठडी *

 

*वन विभागाकडून कारवाई ; देवझिरी वनक्षेत्रात झाडाची चोरी करणाऱ्यास एकास वन कोठडी*

जळगाव, दिनांक 11 मार्च (वृत्तसेवा जिमाका) :

देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मधील राखीव वनात राजेंद्र डोका-या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली असता सदर इसमाने महिला वनरक्षक यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून पसार झाला होता. सदर घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला वनरक्षक राजेंद्र डोका-या पावरा विरुध्द गुन्हा दाखल केला. सदर आरोपीस न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चोपडा यांनी सदर आरोपी यांस ११ मार्च 2024 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. व इतर वनगुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम तयार करण्यांत आली असुन वनगुन्हयातील काही आरोपी हे फरार आहेत. फरार आरोपीची शोध मोहिम चालु आहे.

पुढील तपास जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल. आर. बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी (प्रा.) व किरण श. गजरे, वनपाल बोरमळी हे करीत आहेत.

0000