Friday, 28 February 2014

निवृत्तीवेतनधारकाचे वेतन 3 मार्च रोजी

निवृत्तीवेतनधारकाचे वेतन  3 मार्च रोजी

             जळगाव, दि. 28 :- आयकर परिगणना करणे , हयातीचे दाखले संकलीत करणे आदि अतिरिक्त कामकाजामुळे कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या राज्य निवृत्तीवेतनधारकांचे माहे फेब्रुवारी 2014 चे निवृत्ती वेतन 3 मार्च रोजी अदा करण्यात येईल असे जिल्हा कोषागर अधिकारी यांनी कळविले आहे.

* * * * * * *
आत्मा अंतर्गत जिल्हयातील शेतक-याचे फर्टिंगेशनचे प्रशिक्षण

          जळगाव, दि. 28 :- जळगाव जिल्हयातील 750 शेतक-यांचे जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव येथे ठिबक सिंचनाव्दारे विद्राव्या खतांचा वापर (फर्टीगेशन) या विषयावर दोन दिवसाचे प्रशिक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे
         प्रशिक्षण कालावधी पुढीलप्रमाणे - जळगाव, भुसावळ, मुक्तानगर, रावेर, यावल दिनांक 10 ते 11 मार्च,बोदवड, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव दिनांक 12 ते 13 मार्च, अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल, चोपडा दिनांक 14 ते 15 मार्च सदरील प्रशिक्षण सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत राहणार आहे.  येण्या जाण्याचा खर्च शेतक-यांना स्वत: करावयाचा असून शेतकरी लोकवाटा रुपये 40 प्रति शेतकरी राहणार असून लोकवाटा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे.
           प्रति तालुका 50 शेतकरी सदरील प्रशिक्षणासाठी निवडावयाचे आहेत. ज्या शेतक-यांना प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधुन प्रशिक्षणाला उपस्थित राहता येईल. परस्पर प्रशिक्षणाला प्रवेश मिळणार नाही. प्रशिक्षण स्थळी शेतक-यासाठी  नास्ता, दुपारचे जेवण व चहाची सोय करण्यात आली आहे.   
         तरी शेतकरी बांधवानी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
* * * * * * *

स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती
सेवाकराची वाढीव शुल्क आकारणी 1 मार्च पासून

            जळगाव, दिनांक 28 :- शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती स्मार्टकार्ड तसेच स्मार्टकार्ड नोंदणी प्रमणापत्राबाबत दिनांक 15 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार वाढीव शुल्क आकारणी केली असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
        शिकाऊ अनुज्ञप्ती - मुळ शुल्क रुपये 30/- लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रु 0.67/-, उमेदवारांनी देय शुल्क 31 रुपये.
       पक्की अनुज्ञप्ती - मुळ शुल्क रुपये 200/-, लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रु. 10.79, उमेदवारांनी देय शुल्क 211 रुपये
       स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाणपत्र - मुळ शुल्क रुपये 350/-, लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रुपये 43.26, उमेदवारांनी देय शुल्क 394 रुपये
          स्मार्टकार्ड नोंदणी प्रमापणत्र व अनुज्ञप्ती व सेवाकराची आकारणी शुल्क दि. 1 मार्च 2014 पासून अंमलात येत आहे.जनतेने व वाहन धारकांनी नोंद घ्यावी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.                                               

* * * * * * *

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

          जळगाव,दि. 28:-  राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- शनिवार दिनांक 1 मार्च 2014 रोजी  7.20 वा. महानगरी एक्सप्रेसने भुसावळ येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. भुसावळ मतदार संघासाठी राखीव, रविवार दिनांक 2 मार्च 2014 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय मोटारीने जळगावकडे रवाना, सकाळी 11.00 वा. आद्यकवी महर्षी वाल्मिक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित स्थळ – कांताई सभागृह, जुने नटराज थिएटर, जळगाव, दुपारी सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. शासकीय मोटारीने चाळीसगावकडे प्रयाण, संध्या 5.00 वा. रोजगार व स्वयंरोजगार , कवी संमेलन व सत्कार कार्यक्रमास उपस्थित, स्थळ - चाळीसगाव, रात्री सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण व आगमन.
* * * * * * *

ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव, दि. 28 :- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 1 मार्च 2014 रोजी सकाळी  6.05 वा. राजेंद्र नगर एसप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व वाहनाने कोथळी , ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण
किंवा
             सकाळी 7.20 वा. महानगरी एसप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने कोथळी, ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, कोथळी ता. मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव, दिवसभर मुक्ताईनगर मतदार संघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती, रात्री कोथळी, ता. मुक्ताईनगर येथे मुक्काम

* * * * * * *

राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
डॉ. आसिफ शेख यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

         जळगाव, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) डॉ. आसिफ शेख यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. – रविवार दिनांक 2 मार्च 2014 रोजी दुपारी 3.00 वा. मालेगावहून चाळीसगावला प्रयाण, सायंकाळी 5.00 वा. चाळीसगाव शहरात आगमन (रेस्ट हाऊस), सायंकाळी 6.30 वा. N.C.P. तालुका अध्यक्ष आमदार, शहराध्यक्ष व पदाधिकारी समवेत चर्चा , सायंकाळी 7.00 वा. श्री. अल्लाउद्दीन N.C.P. अल्पसंख्यांक प्रदेश सचिव यांचेकडील कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 ते 10 वा. राखीव.

* * * * * * *

Tuesday, 25 February 2014

मस्त्यव्यवसायाच्या ठेकाची रक्कम 30 एप्रिल पूर्वी जमा करावी

मस्त्यव्यवसायाच्या ठेकाची रक्कम 30 एप्रिल पूर्वी जमा करावी

             जळगाव, दि. 25 :- जळगाव जिल्हयातील पाटबंधारे विभागाचे तलाव मत्स्यव्यवसायासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, खाजगी व्यक्तीना सन 2014-15 वर्षाकरीता ठेक्याने दिल्या आहेत.
           दि. 22 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार मत्स्यपालन सहकारी संस्था, खाजगी व्यक्तीकडे ठेक्याने मत्स्यव्यवसायासाठी असलेल्या पाटबंधारे विभागच्या तलावांची ठेक्का रक्कम दिनांक 30 एप्रिल   पर्यंत शासनाकडे जमा करणे बंधनकारक आहे. 30 एप्रिल पर्यंत तलाव ठेका रक्कम शासनाकडे जमा करणार नाही अशा तलावांचा तलाव ठेका मुदत पूर्व समाप्त करण्यात येईल. कोणत्याही कारणास्तव विलंब आकार किंवा मुदत वाढवून तलाव ठेका रक्कम स्विकारण्यात येणार नाही. असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * * *

डाक अदालत 18 मार्च रोजी

            जळगाव, दिनांक 25 :- पोस्टाच्या टपाल, स्पीड- पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 18 मार्च 2014 रोजी दुपारी  2.30 वाजता  डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
              पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी   आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी, डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी. पी ओ बिल्‍िडंग दुसरा माळा, मुंबई  यांच्या नांवे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 1 मार्च 2014 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी  संबंधितानी डाक अदालतीचा लाभ घ्यावा  असे आवाहन  चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी केले आहे.                                                      
* * * * * * *

Thursday, 20 February 2014

सेवाविषयक जातीदावा प्रस्ताव विशेष त्रुटी पूर्तता मोहिम आजपासून

सेवाविषयक जातीदावा प्रस्ताव
विशेष त्रुटी पूर्तता मोहिम आजपासून
                            
             जळगाव, दि. 20 :- विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 2 नाशिक, मुख्यालय धुळे, यांच्याकडे माहे जुन व जुलै 2013 मध्ये जमा करण्यात आलेल्या सेवा विषयक जातीदावा प्रस्तावांवर समितीचा निर्णय झालेला आहे. यात काही जातीदावा प्रस्तावांमध्ये त्रुटीअथवा उणिवा आढळून आलेल्या आहेत. अशा जातीदावा प्रस्तावांची यादी www.barti.cdac.in  या संकेत स्थळावर त्रुटीसह प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
             त्रुटी अथवा उणिवा असलेला जातीदावा प्रस्तावांसाठी  समिती कार्यालयामार्फत त्रुटी पुर्तता विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही मोहिम दिनांक 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी  10.30 ते सायं. 6.00 वाजे पर्यंत अखंड राबविण्यात येईल. संबधितांनी आपल्या जातीदावा प्रस्तावातील त्रुटी समिती कार्यालयात जमा करुन या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच दिनांक 30 जुलै 2013 च्या शासन निर्णयानुसार सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना वैधता प्रमाणपत्राची आवश्यक नसल्याने अशा अर्जदारांच्या जातीदावा प्रस्तावावर समिती निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा अशा कर्मचा-यांनी समिती कार्यालयात चौकशी करु नये. वैधता प्रमाणपत्रांचे वाटप देखील समिती कार्यालयात सुरु आहे. असे आवाहन समितीचे अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, उपायुक्त तथा सदस्य साहेबराव जाधव तसेच संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राकेश पाटील यांनी केले आहे. 

* * * * * * * *

हरभरा पिकावरील किड रोग नियंत्रणासाठी
कृषी विभागाचा मार्गदर्शनपर सल्ला

           जळगाव, दि. 20 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर , मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील हरभरा पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत  हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी
विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे.- 
            हरभरा : मर – मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला असून नियमित निरीक्षणे घेवून रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करुन पुढील प्रादुर्भाव पसरणार नाही,
            हरभरा : मर – मरग्रस्त झाडे मुळासकट (मातीसकट) उपटून जाळून नष्ट केल्याने पुढील प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव होईल. पाण्याची पाळी देण्यापूर्वी प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो शेणखत 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळून टाकल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  

* * * * * * *

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार – 2014

           जळगाव, दि. 20 :- जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जळगाव जिल्हयात  कार्यरत अंगणवाडी सेविकांना अत्युकृष्ट काम केल्याबद्दल आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद जळगाव, छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
          सदरचा पुरस्कार सन 2012 – 13 यावर्षासाठी देण्यात येणार आहे.  जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, यांचे अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.  कार्यक्रमाचे उदघाटन सौ. लिलाताई भिलाभाऊ सोनवणे, सभापती महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद जळगाव यांचे हस्ते होणार असून, शीतल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


* * * * * * * *

Tuesday, 18 February 2014

चारित्र्यसंपन्न माणूस घडविते ते शिक्षण : शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचे प्रतिपादन


चारित्र्यसंपन्न माणूस घडविते ते शिक्षण
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचे प्रतिपादन

चोपडा, जि. जळगाव, दि.18- माणसाच्या आयुष्यात होणा-या बौद्धिक विकासा पैकी 80 टक्के विकास हा शालेय जीवनातच होतो. या वयात मिळालेले शिक्षण आणि संस्कार हे पुढील आयुष्यात कामात येतात. म्हणूनच चारित्र्यसंपन्न माणूस घडविते तेच खरे शिक्षण, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. चोपडा येथील भगिनी मंडळ व्हॉलिंटरी स्कूल चा सुवर्ण महोत्सवी समारंभ आज पार पडला. त्यावेळी त्या  बोलत होत्या.
 या सोहळ्याच्या उदघाटनासाठी उदघाटक म्हणून सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास    ( औकाफसह) राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान या उपस्थित होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी  उपस्थित होते.
याप्रसंगी  राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान म्हणाल्या की, केवळ गुण प्राप्त करणे हे शिक्षण नाही. परंतू आज समाजात दुर्देवाने त्यालाच महत्त्व दिले जाते. जीवनासाठी सज्ज माणूस तयार करण्याचे काम शिक्षण करते. शाळांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व घडवावीत जी समजाला प्रेरणादायी ठरतील.
या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशदादा पाटील, आ. जगदिशचंद्र वळवी, माजी आ.दिलीप सोनवणे, नगराध्यक्ष संदीप पाटील, चोपडा पंचायत समितीचे सभापती डी.पी.साळुंखे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  शिवाजीराव पाटील, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुशिला शाह, सचिव उर्मिला गुजराथी, सुवर्ण महोस्तव समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र शिरसाठ, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ओलावा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी  विद्यालयाच्या प्रथम शिक्षिका, तसेच माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. सुशिला शाह  यांनी ,आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांनी  केले तर सूत्रसंचलन पोर्णिमा हुंडीवाले यांनी केले.

                                                                 * * * * * * * * *

Monday, 17 February 2014

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पदभार स्विकारला


जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पदभार स्विकारला

 जळगाव, दि.17 -  जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज सकाळी स्विकारला. मावळते जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी विधीवत त्यांचेकडे पदभार सोपविला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम,  उपजिल्हाधिकारी साजिद पठाण, मनोहर चौधरी , श्रीमती सावरकर तसेच महसूल प्रशासनाचे व जिल्हाप्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नूतन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या 2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.  महर्षि दयानंद विद्यापिठ, अजमेर येथून त्यांनी अर्थशास्त्र, इतिहास या विषयांसह बीए ही पदवी प्राप्त केली आहे. 1/09/2010 ते 2/03/2011 याकालावधीत कुर्डूवाडी येथे उपजिल्हाधिकारी व 3/3/2011  ते 5/2/2014 या कालावधीत त्या अहमदनगर  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून त्यांनी प्रशासकीय जबाबदा-या सांभाळल्या आहेत.
* * * * * * *

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

              जळगाव, दि. 17 :-  सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास          ( औकाफसह) राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
            मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2014 रोजी सकाळी  7.00 वा.औरंगाबाद निवास्थान येथुन चोपडाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह चोपडा येथे राखीव, सकाळी 10.30 भगिनी मंडळ, चोपडा शैक्षणिक संकुल सुवर्ण महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ चोपडा, दुपारी 12.00 वा. राखीव, दुपारी 12.30 वा. चोपडा येथुन इदगाव - जळगाव मार्गे औरंगाबादकडे प्रयाण.


* * * * * *

Saturday, 15 February 2014

अन्नसुरक्षा पोहोचविण्याचे आव्हान स्विकारा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरपंच महापरिषदेत आवाहन


अन्नसुरक्षा पोहोचविण्याचे आव्हान स्विकारा
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरपंच महापरिषदेत आवाहन

जळगाव, दि.15 -  कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी प्रत्येकाला अन्न उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे आहे. हे काम अन्न सुरक्षेच्या माध्यमातून होत आहे. आपल्या गावातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही अन्न सुरक्षा पोहोचविण्याचे आव्हान गावचे प्रमुख म्हणून आपण सा-यांनी स्विकारावे, असे आवाहन केंद्रीय कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री शरद पवार यांनी आज येथे केले. सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित ॲग्रोवन सरपंच महापरिषदेचे उद्‌घाटक म्हणून ना. पवार हे राज्यभरातील सरपंचांशी संवाद साधत होते.
येथील जैन हिल्स येथे आयोजित सरपंच महापरिषदेस राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या-विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे,"सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष भवरलाल जैन, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. पवार म्हणाले की,ग्रामपंचायत लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. देशाशी निगडीत सर्व प्रश्न हे गावातील प्रश्नांशी निगडीत आहे. देशातील 82 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. लहरी निसर्गामुळे या शेतीवर विसंबून राहता येत नाही. त्यासाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक थेंब अडवून जिरवून भुगर्भातील पाण्याची पातळी वाढ़वून आवश्यक तितकेच पानी वापरले गेले पाहिजे. त्यासाठी पिकांचे नियोजन गावपातळीवर होणे महत्त्वाचे आहे. या कामी सरपंच म्हणून आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पिण्याचे पाणी हे शुद्धच असले पाहिजे. स्वच्छता, चांगले रस्ते आणि वृक्षवेलींनी नटलेले गाव मनाला आनंद देते. आदर्श गावांसाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविणा-या ग्रामपंचायतीत महाराष्ट्रातील गावांची संख्या दरवर्षी वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे.
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतीत गुंतवणूक वाढणे महत्त्वाचे आहे. शेतक-यांना दिलेल्या 72 हजार कोटीच्या कर्जमाफीमुळे नवीन कर्जपुरवठ्याचे मार्ग मोकळे होऊन शेती क्षेत्रात 6 लाख 90 हजार कोटी पर्यंतचा कर्जपुरवठा वाढला. अन्नधान्य उत्पादन वाढले. भारत हा जगात तांदूळ निर्यातीत क्रमांक एक वर आहे तर कापूस, गहू आणि साखर निर्यातीत क्रमांक दोन वर आहे. शेतक-यांनी केलेल्या या परिश्रमामुळे हे शक्य झाले आणि म्हणूनच देशात अन्न सुरक्षेचा कायदा लागू करता आला. अन्न धान्य उत्पन्नाचे गेल्या 60 वर्षातले नवे विक्रम आमच्या शेतक-यांनी घडविले. यंदा 263.6 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. हे गावातला तरुण शेतकरी जोमाने कामाला लागल्याचे द्योतक आहे. ग्रामपंचायतींमध्ये नवी शिकलेली पिढ़ी आणि महिला आल्या त्यामुळे चांगला कारभार होतो आहे. भावी पिढ़ी संपन्न करायची असेल तर गावच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा आणि शंभर टक्के उपस्थितीकडे लक्ष द्या. त्यासाठी शाळा समितीवर महिलांची नेमणूक करा. आत्मविश्वासाने उभी रहिलेली स्त्री ही देशाचा ठेवा आहे हा ठेवा वाढवा असा संदेशही त्यांनी यावेळी उपस्थित सरपंचांना दिला. ग्रामपंचायत व्यवस्थेतून तुमचे नेतृत्व उभे राहते, तेव्हा कर्तृत्व सिद्ध करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री सावकारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामविकासासाठी शासनाच्या विविध योजना असून त्या राबविण्याची जबाबदारी सरपंचांनी पार पाडली तरी चांगले काम होते, म्हणून सरपंचांनी आपले ग्रामविकासाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. या निमित्त व्यासपिठावर उपस्थित मान्यवर प्रतापराव पवार, डॉ. अभय फिरोदीया, प्रमोद रायसोनी आणि भवरलाल जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ना. पवार यांच्या हस्ते अप्पासाहेब पवार यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट ‘वटवृक्ष’चे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास विधानभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, कविवर्य ना. धो. महानोर,  जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, आ. राजीव देशमुख, आ. जगदिश वळवी, आ. दिलीप वाघ, ॲड. रविंद्र पाटील  यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी केले.

* * * * * * * *

Friday, 14 February 2014

इ. 10 वी परीक्षा साहित्य वाटप

इ. 10 वी  परीक्षा साहित्य वाटप
  
           जळगाव, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र  (इयत्ता 10 वी) मार्च 2014  परीक्षेस प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र, प्रात्याक्षिक, तोंडी, श्रेणी तसेच तंत्र व पूर्व व्यवसायिक विषयांच्या परीक्षेचे साहित्य नेहमीच्या वाटप केंद्रावर जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर येथे दिनांक 18 फेब्रुवारी  2014 रोजी सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. संबंधित शाळांच्या प्रमुखांनी नोंद घेवून आपला जबाबदार प्रतिनिधी अधिकार पत्रासह दिनांक 18 रोजी वाटप केंद्रावर  पाठवावा.
            तसेच  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 12 वी ) फेब्रुवारी 2014 च्या परीक्षेतील वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव माराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ , नाशिक यांनी केले आहे.

* * * * * * * *

रुफ लाईट बसविणे प्रस्तावित रिक्षा टॅक्सी संघटनांकडून हरकती मागविल्या

                जळगाव, दि. 14 :- हकीम समितीच्या शिफारशीनुसार शासनाने राज्यातील सर्व टॅक्सी व रिक्षाच्या टपावर दर्शक दिवा अर्थात रुफलाईट बसविणे बंधनकारक केले आहे. रुफलाईट बसविल्याने कोणतीही टॅक्सी किंवा ऑटोरिक्षा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे किंवा नाही हे 100 ते 150 मीटर अंतरावरुन लक्षात येईल, त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांकडून प्रवाशी नाकारण्याच्या प्रकरणांमध्ये घट होईल.
               सदर रुफलाईटची तरतुद महाराष्ट्र मोटार वाहन नियमांत करणे प्रस्तावित आहे. ही तरतूद अंमलात आणल्यानतर राज्यात सर्व टॅक्सी रिक्षाच्या टपावर रुफलाईट बसविणे बंधनकारक राहील.
               परवानधारक रिक्षा, टॅक्सी संघटनाचे याबाबत काही हरकती असल्यास लेखी स्वरुपात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचेकडे दिनांक 15 फेब्रुवारी  पर्यंत सादर कराव्यात असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

* * * * * * * *

आय टी आय मध्ये ड्रायव्हिंग प्रशिक्षण

               जळगाव, दि. 14 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे दि. 15 पासून मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी अनुभवी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशिक्षण दरम्यान गाडीच्या विविध उपांगे / इंजिन बाबत माहिती देण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतत्र बॅच राहील.
              प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे - अभ्यासक्रमाचा कालावधी 21 दिवसात (10 तास), प्रवेश क्षमता - एका बॅचमध्ये 15 ते 20 प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण शुल्क प्रति प्रशिक्षणर्थी रु. 2800/-, प्रशिक्षणाची वेळ प्रशिक्षणर्थ्यांच्या सोयीनुसार राहील. सदर प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थ्यास संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 025-2234520 वर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी कळविले आहे.


* * * * * * * *

Thursday, 13 February 2014

आहरण संवितरण अधिका-यांची कार्यशाळा

आहरण संवितरण अधिका-यांची कार्यशाळा

              जळगाव, दि. 13 :-  जळगाव कोषागाराच्या व उपकोषागार कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी, राज्य शासकीय कर्मचारी तसेच पुरवठादार व कंत्राटदार यांच्याकडून आयकर ( T D S) वसुली संदर्भात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हयातील सर्व आहरण व सवितरण अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यानी केले आहे.

* * * * * * * * *

हरभरा पिकावरील  किड रोग  नियंत्रणासाठी
  कृषी विभागाचा मार्गदर्शनपर सल्ला

             जळगाव, दि. 13 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर , मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील हरभरा पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत  हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी  विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे.
            हरभरा : मर - मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला असून नियमित निरीक्षणे घेवून रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करुन पुढील प्रादुर्भाव पसरणार नाही. 

* * * * * * * * *

माजी सैनिक तालुका समिती  बैठक

           जळगाव, दि. 13 -  माजी सैनिक / विधवा व त्यांचे अवलंबितांच्या अडी अडचणी सोडविण्याकरिता गठीत केलेल्या समितीची बैठक एरंडोल येथे दिनांक 25 फेब्रुवारी तर रावेर येथे 26 रोजी 11.30 वाजता तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. तरी संबंधीत तालुक्यातील माजी सैनिक / अवलंबितांनी त्यांच्या अडी अडचणी असल्यास लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणाव्यात व बैठकीस हजर राहून आपले प्रकरण तहसिलदारांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे असे  आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर (नि.) मिलींदकुमार  एम. बडगे,  यांनी केले आहे.                                       

* * * * * * * * *

माजी सैनिकांना रोजगाराची संधी

            जळगाव, दि. 13 :- रेल्वेमध्ये विविध संवर्गातील लोको पायलट व टेक्नीशियन ही पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात दिनांक 18 ते 25 जानेवारी 2014 च्या एम्प्लायमेंट न्यूज नं 01/2014 प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी जळगाव जिल्हयातील जास्तीत जास्त पात्रताधारक माजी सैनिकांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे यांनी केले आहे.
                                                     

* * * * * * * * *

Monday, 10 February 2014

बोदवड प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती

बोदवड प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती

          जळगाव, दि. 10 :- एकात्मिक बालविकास सेवा योजना, बोदवड प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनीसांची रिक्तपदे स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
          रिक्तपद भरावाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. ग्रामपंचात बोदवड गाव बोदवड -अंगणवाडी सेविका 1, मदतनीस 3,कोल्हाडी  -अंगणवाडी सेविका 1, मदतनीस 1,पळासखेडा तांडा -मिनी अंगणवाडी सेविका 1, मुक्तळ - अंगणवाडी सेविका -1, मदतीनस -1, साळशिंग- मदतनीस - 1,शेळगे (चिखली) मिनी अंगणवाडी -1, बोरगाव - मिनी अंगणवाडी सेविका -1   
        अर्ज सादर करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे - अर्जदाराचे वय दि. 31 जानेवारी 2014 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 35 वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास 2 अपत्याचे वर अपत्य नसावीत, तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, महिला असावी, अर्जदार  स्थानिक रहीवाशी असावी. (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक पात्रता  किमान दहावी पास ते उच्चत्तम, मदतनीसासाठी किमान सातवी पास ते उच्चत्तम, अर्ज कार्यालयने वितरीत केलेला व विहीत नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी पंचायत समितीचा दाखला असावा, विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 7 गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम प्राधिका-याचा असावा ( एस. सी / एस. टी. / व्ही. जे. एन. टी / ओबीसी / एस. बी. सी.), मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी 10 गुण, व्ही. जे. एन. टी. / ओबीसी / एस. बी. सी. साठी 3 अतिरिक्त गुण देण्यात येतील. अर्जदार शिक्षण शास्त्र पदविका पात्र असल्यास प्रमाणपत्र व मार्कशिट जोडण्यात यावे. त्याचे अतिरिक्त 5 गुण देण्यात येतील, अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिका-याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित वा खाजगी संस्थंचा दाखला ग्राहय धरण्यात येणार नाही. रिक्तपदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास तसा बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आहे. अर्ज विक्री दि. 7 फेब्रुवारी 2014 पासून 17 फेब्रुवारी 2014 पर्यंत असून अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2014 ते 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत राहील. शासकीय सुटीचे दिवशी अर्ज विक्री व स्विकारणे बंद राहील. असे बाल विकास अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना बोदवड यांनी कळविले आहे.

                                                                     * * * * * * *

Friday, 7 February 2014

राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनातील बाधित शेतक-यांना मोबदला मिळवून देणार:आमदार राजीव देशमुख



राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनातील
बाधित शेतक-यांना मोबदला मिळवून देणार
                                                                :आमदार राजीव देशमुख

            चाळीसगाव, दिनांक 07 :-  रा.म.मार्ग क्रं.211 औरंगाबाद-धुळे या मार्गाचे चौपदरीकरणामुळे बाधित होणा-या शेतक-यांना शासन स्तरावर प्रयत्न करुन मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असे आमदार राजीव देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. या प्रसंगी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, प्रकल्प संचालक एस.पी.खलाटे, उपअधिक्षक भुमी अभिलेख आर.आर.यशोद, या कामकाजासाठी गठीत केलेल्या समिती सदस्य, ॲड.पवार, ॲड.किर्ती पवार, ॲड.मनोज पाचपोळ, शेषराव पाटील मिलींद शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी आमदार देशमुख यांनी भुसंपादन कामकाजाचा संपुर्ण आढावा घेऊन संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व ज्यांचे मार्फत भुसंपादनाचे दावे दाखल झाले आहेत त्या अभियोक्त्यांची तसेच ज्या लाभधारक शेतक-यांचा मोबदला व वाढीव मोबदला प्रलंबीत आहे अशा शेतक-यांची सद्यस्थिती बाबतची माहिती एक आठवडयात तपशिलवारपणे पुर्ण करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी यांना दिल्यात. प्रलंबित भुसंपादनाचा मोबदला व वाढीव मोबदला संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करुन अंतिमरित्या कार्यवाहीसंबंधी प्रयत्नशील राहून बाधीत शेतक-यांना त्यांच्या भुसंपादन मोबदल्याची रक्कम मिळवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राजीव देशमुख यांनी या बैठकीत दिले.
            तसेच 1988 मध्ये झालेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा देखील प्रलंबित वाढीव मोबदलाच्या मागणीसाठी उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल आमदार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदण केले. राष्ट्रीय मार्गातील अडथळा दुर करुन दळणवळणाच्या महत्वपुर्ण कामासाठी सर्व बाधीत शेतक-यांना गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातुन न्याय मिळवून देण्यास आपण कटिबध्द असल्याचेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

* * * * * * * *

कृषि वसंत 2014 या कृषि प्रदर्शनाचे
कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगावं येथे थेट प्रक्षेपण

चाळीसगाव, दिनांक 07 :-  देशातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन कृषि वसंत 2014  हे नागपूर येथे दिनांक 09 ते 13 फेब्रुवारी,2014 दरम्यान भरविण्यात येत असून तालुक्यातील शेतक-यांना या कृषि प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ होण्यासाठी चाळीसगाव कृषि उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. कृषि प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण हे दिनांक 09 ते 13 फेब्रुवारी, 2014 या दरम्यान सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत प्रसारण करण्यात येणार असून त्यासाठी बाजार समितीने 200 शेतक-यांची बैठक व्यवस्था केली आहे. प्रसारणासाठी 54 इंची प्लाझमा प्रोजेक्शन टिव्हीची उभारणी केली असून परिसरातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत कळविण्यात आले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने शासनाचा पुढाकार, परिसंवाद व चर्चासत्र, कृषि विषयक प्रात्यक्षिके, शेतक-यांच्या यशोगाथा, आतंराष्ट्रीय तज्ञ प्रतिनिधींचा सहभाग, सांस्कृतीक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असे प्रमुख वैशिष्टये  या कृषि प्रदर्शनाची असुन तालुक्यातील शेतक-यांनी या प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहिदास पाटील यांनी केले आहे.
* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व छायाचित्र हे  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* * * * * * * *

Saturday, 1 February 2014

ना.उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

ना.उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
  
            चाळीसगाव, दिनांक 01 :-  मा.ना.उदय सामंत, राज्यमंत्री, नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण व माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय आणि मत्स्यव्यवसाय व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांचा जळगाव दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे
दिनांक 02 फेब्रुवारी, 2014 सकाळी 08:45 वाजता मुंबई येथुन खाजगी हेलिकॉप्टरने पारोळा जि.जळगावकडे प्रयाण सकाळी 10:25 पारोळा जि.जळगाव येथे आगमन सकाळी 10:30 ते 11:00 दरम्यान पारोळा व एरंडोल विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सकाळी 11:30 ते 12:00 राखीव दुपारी 12:00 वाजता पारोळा जि.जळगांव येथुन खाजगी हेलिकॉप्टरने चाळीसगावकडे प्रयाण दुपारी 12:15 वाजता शासकीय दुध डेअरी, धुळे रोड चाळीसगाव येथे आगमन, दुपारी 12:20 ते 01:20 चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक. दुपारी 01:25 वाजता चाळीसगाव येथुन खाजगी हेलिकॉप्टरने कुसळंब ता.पटोदा जि.बिड कडे प्रयाण
दिनांक 03 फेब्रुवारी, 2014 सकाळी 07:30 वाजता औरगांबाद येथुन मोटारीने पाचोरा जि.जळगांवकडे प्रयाण सकाळी 11:00 वाजता पाचोरा येथे आगमन सकाळी 11:30 ते 12:30 पाचोरा व भडगांव विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक दुपारी 12:30 ते 01:00 राखीव दुपारी 01:00 वाजता शासकीय मोटारीने अमळनेरकडे प्रयाण दुपारी 02:30 ते 03:30 अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक दुपारी 03:30 अमळनेर येथुन शासकीय मोटारीने जळगावकडे प्रयाण दुपारी 04:30 ते 05:30 जळगाव ग्रामीण (धरणगांव) विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सायं 05:30 ते 06:30 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सायं. 06:30 ते 11:00 राखीव अजिंठा विश्रामगृह जळगाव रात्री 11:15 जळगाव येथुन अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण
* * * * * * * *
ना.संजय सावकारे, कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
  
चाळीसगाव, दिनांक 1 :-  मा.ना.संजय सावकारे, राज्यमंत्री, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या व विमुक्त जाती व मागासवर्गीयांचे कल्याण तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांचा जळगाव जिल्हा दौरा खालील प्रमाणे
दिनांक 02 फेब्रुवारी, 2014 सकाळी 08:00 वाजता शासकीय मोटारीने  पारोळा जि.जळगावकडे प्रयाण सकाळी 10:25 वाजता मा.ना.उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित, सकाळी 10:30 ते 01:30 मा.ना.उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री यांचे समवेत पारोळा व चाळीसगाव येथील विविध कार्यक्रमास उपस्थित दुपारी 02:00 वाजता शासकीय मोटारीने रावेरकडे प्रयाण दुपारी 04:00 वाजता चिनावल/रावेर येथील कार्यक्रमास उपस्थिती संध्याकाळी सोईनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण             
* * * * * * * *
चाळीसगाव तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ
उपस्थितीसाठी तहसिलदारांचे आवाहन
  
              चाळीसगाव, दिनांक 1 :-  महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ दिनांक 02 फेब्रुवारी, 2014 रोजी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते व कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डेराबर्डी, चाळीसगाव येथे संपन्न होत असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजीव देशमुख, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपविभागीय अधिकारी मनोज घोटे-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.


* * * * * * * *