Tuesday, 6 August 2024

मुलांचे शासकीय वसतीगृहात

 मागासवर्गीय मुलांचे शासकीय

वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

जळगाव, दिनांक 6 ऑगस्ट ( जिमाका ) : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सिंधी कॉलनी, अंध शाळेजवळ जळगांव येथे कार्यरत आहे. या वस्तीगृहात व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित, जाती, इमाव, अनाथ, अपंग, या, संवर्गतील विदयार्थांनी https://hmas.mahait.org या वेबसाईडवर दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. व भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी वसतिगृहात जमा करावी तसेच, ऑनलाईन प्रणालिचे हे प्रथम वर्ष असल्याने कार्यालय स्तरावर काही तांत्रिक अडचणी उध्दभवल्यास प्रणालीचे तांत्रिक कक्ष mahait support@mahaonline.gov.in या ईमेलवर थेट संपर्कसाधुन त्रुटी निराकरण करून घ्यावे, असे आव्हान वस्तीगृहातील अधिक्षक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment