Friday, 31 May 2024

विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा

                                विधिमंडळ कामकाजाबाबत
                            मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा


            मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. ३ जून २०२४ रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.

            या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव श्री.भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव श्री.कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे मार्गदर्शन करतील.

            विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग अधिवेशन कामकाजाचे वार्तांकनासाठी करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.

००००

पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट



पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची 

काठीवाडी पशुपालकांना भेट

जळगाव, दिनांक 31 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : यांच्या मार्गदर्शन खाली पशुसंवर्धन विभागामार्फत 31 मे रोजी एरंडोल जवळ महामार्गा लगत स्थायिक असलेले 8 काठीवाडी पशुपालकांना भेटी देण्यात आल्या. येथे साधारण 400 गाई व 130 म्हैस या पालकांकडे आहे. येथे पुरेसा चारा उपलब्ध असून जवळच पाणी सुद्धा उपलब्ध आहे तसेच चराई साठी जवळचे शेतात चराई करण्यात येते याबाबत माहिती घेण्यात आली. चरायला जाण्याची वेळ सकाळी 7 ते 11 व संध्याकाळी 4 नंतर असावी तसेच दुपारचे वेळेस सावलीत जनावरे ठेवणे त्यांना दिवसातून तीन ते 4 वेळा मुबलक थंड पाणी पाजणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच गाई- म्हशी ची पाहणी केली असता त्यातील काही गाई वयस्कर आणि अशक्त असल्याने त्यांना तत्काळ औषधुपचार, mineral mixture व जंतनाशक देण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशसंवर्धन डॉ. अशोक महाजन धरणगाव, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. राहुल साळुंके, श्री. वासू वंजारी व MVU स्टाफ श्री. सुदर्शन पाटील LSS आणि श्री. भूषण कोळी ड्रायव्हर cum attendant हे उपस्थित होते. 

0 0 0 0 0 0 0 0

जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद




 जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध 

उपाययोजना करणार
- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

▪️बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर

▪️जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती

▪️वाहतुक नियंत्रणासाठी रेडक्रॉस देणार वॉर्डन

▪️कार रेस लावणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

▪️दुभाजक तोडणाऱ्यावर करण्यात येणार कडक कारवाई 

जळगाव, दिनांक 31 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील वाढती गर्दी,वाढलेले सिमेंटचे रस्ते आणि नवतरुणांच्या गाड्यांचे वाढते वेग यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि आरटीओ संयुक्त प्रयत्न करतील.हेल्मेट घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्यामुळे इथून पुढे ती सवय लागावी म्हणून इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटनांचे,स्वयंसेवी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाढती गरज लक्षात घेवून योग्य ते वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असून यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि आर टी ओ यांनी समन्वयाने जिथे गरज असेल तिथे वाहतूक सुरक्षा संदर्भात उपाययोजना कराव्यात हे सांगून बाहेर येणारी जड वाहतूक बायपासचे काम होत नाही तो पर्यंत सुरु राहिल. येत्या काही महिन्यात ते काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. एकदा बायपासचे काम पूर्ण झाले की मुख्यरस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्याबरोबर ज्या ज्या गोष्टी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या केल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

आता जिल्हाधिकारी कार्यालयात येताना हेल्मेट अनिवार्य

नागरिकांना दुचाकी वाहन चालवताना डोक्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. आता शहरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे गाड्यांचे वेग वाढतायत, कमी वेगाने गाड्या चालविण्याची संस्कृती रूळविण्यासाठी सुरुवातीला वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना देऊन लोकांना हेल्मेटची सवय लागावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दुचाकीचालकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून रेडक्रॉस सोसायटी कडून वॉर्डन देणार असल्याची घोषणा रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. महामार्गावरले आपल्या सोयीसाठी म्हणून अनेकांकडून दुभाजक तोडण्याचे काम होते आहे. हे अपघाताला निमंत्रण असून असे करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले. तसेच महामार्ग किंवा राज्य मार्ग, शहरातील रस्ते यावर कार रेस लावण्याच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्याकडून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

प्रारंभी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या कडून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षिततेबाबत सविस्तर सादरीकरण झाले. त्यात जिल्ह्यातील तीन ब्लँक स्पॉटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वते उपाययोजना झाल्या असून जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र शोधले असून येत्या काही महिन्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

0 0 0 0 0 0 0 

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुदानासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

 संजय गांधी निराधार अनुदान योजना 

व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 

अनुदानासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 31 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डी.बी.टी व्दारे करणेकरिता दि. 7 फेब्रुवारी, 2024 रोजी मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली झालेली व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 तसेच दिनांक 15 मार्च, 2024 व 31 मे, 2024 रोजी सदर विषयी श्रावणबाळ/ संजय गांधी योजनेचे अनुदान डी.बी.टी.व्दारे करणेकरीता आवश्यक कार्यवाही करणेबाबत जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे.

एप्रिल 2024 पासून लाभार्थ्यांना अनुदान हे डी. बी. टी व्दारे वितरीत करणेबाबत शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे आधारकार्ड, बँक पासबुक, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर, योजनेचा प्रकार , जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, लाभार्थ्याच्या आधारला व बँकेस लिंक असलेला मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे 31 मे, 2024 पर्यंत दाखल करावी. जे लाभार्थी सदरील कागदपत्रे सादर करणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी , तरी जळगाव जिल्हयातील विशेष सहाय्य्‍ योजना लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, डी. बी. टी साठी आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित तहसिल कार्यालयांकडे जमा करण्यात येवून सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0 0 0

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रशासनाची तयारी पूर्ण पारदर्शक आणि शांततेसाठी उमेदवारांनी सहकार्य करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन




 जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणी 
प्रशासनाची तयारी पूर्ण
 पारदर्शक आणि शांततेसाठी उमेदवारांनी सहकार्य करण्याचे 
जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

▪️ मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष सकाळी ७ वाजता उघडण्यात येईल

▪️ मतमोजणी कक्षात मोबाईलवर सक्ती बंदी

जळगाव, दिनांक 30 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे.मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल. ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

गुरुवार दि.३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल. मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. 

मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही.मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीं समोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्याना शांतता राखण्याचे आवाहन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले.प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे.किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणूकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.या साठी २७ जून रोजी अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.तर ३० जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.

0 0 0 0 0 0 0 0

Wednesday, 29 May 2024

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

मुंबई, दिनांक २९ मे, : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे. . . . .

1.आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

2. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधनप्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यमदृकश्राव्यसोशल मीडियाप्रकाशनेव्हिडीओ एडिटिंगतंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

4. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल

5. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.

6. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.


अर्ज कोठे करावा?

इच्छुकांनी संशोधन अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय१७ वा मजलानवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोरमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरू चौकमहाराष्ट्र शासनमंत्रालयमुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा. र्जासोबत वैयक्तिक माहितीनमुन्यातील माहितीपदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावीपाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावाअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेलया उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

0 0 0 0 0 0 0 0

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

 महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

 मुंबई, दिनांक २९ मे, : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत  अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्ययांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ ही   पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये एकूण  ६१.३३  इतके टक्के मतदान झाले.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही ३ कोटी ६ लाख ५६ हजार ६११ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या २ कोटी ६३ लाख ४८ हजार ७१७ इतकी आहे. तर इतर मतदार यामध्ये १ हजार ४५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला.   २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकूण मतदार ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ३८९ मतदारांनी मतदान केले होते त्याची  टक्केवारी  ६०.७१ इतकी होती.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्षाकडील फॉर्म - १७ - सी नुसार झालेल्या मतदानाची माहिती त्या केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना पुरवली जाते व अंतिमतः मतमोजणीच्या वेळेस त्याच आकडेवारीशी मतदार यंत्रावरील मतदानाचे आकडे पडताळून पाहिले जातात. Encore या ECI च्या पोर्टल नुसार मतदारसंघ निहाय मतदानाची सविस्तर आकडेवारी सोबत जोडली आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

                    विधान परिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाची
                            द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

मुंबईदिनांक २९ मे, : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे पर्यंत त्या लेखी स्वरुपात मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांना सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सहनिवडणूक अधिकारी मनोहर पारकर यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले की,  विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ)निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दि.७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. या निवडणुकीकरिता शुक्रवार,  ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार१० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार१२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जूलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि.२४ मे २०२४ रोजी या निवडणूकीसाठीचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून तात्काळ संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. मुबंई पदवीधर तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग, हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त, नाशिक तर मुबंई शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.                                  

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

या विधान परिषदेच्या निवडणूकांकरिता अंतिम मतदार यादी दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंत दि.७ जून २०२४ पर्यंत या यादीमध्ये सुधारणा करता येईल. त्यासाठी या दिनांकापूर्वी दहा दिवस आधी म्हणजे दि. २८ मे २०२४ पर्यंत  प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील.  दि.१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात मुंबई मतदारसंघात  दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार  १४,५१५ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,४०४ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ रोजीची  एकूण मतदारसंख्या १५,९१९ इतकी आहे. यामध्ये मुंबई शहर २,७४८ मतदारसंख्या तर मुंबई उपनगरमध्ये १३,१७१ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबई मतदारसंघात एकूण मतदार संख्या  १०,१७० इतकी होती.

नाशिक मतदार संघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार  ६४,८०२ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही  १,७५५  इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या ६६,५५७ इतकी आहे. यामध्ये नाशिक २४,९६५ मतदारसंख्या तर धुळे ८,१६५, नंदुरबार ५,४९५, जळगांव १३,११४अहमदनगर १४,८१८  इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये नाशिक मतदारसंघात एकूण मतदार संख्या  ५३,८९२ इतकी होती.

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या ९१,२६३  इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही २५,६६० इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची  एकूण मतदारसंख्या १,१६,९२३ इतकी आहे. यामध्ये मुबंई शहर मध्ये ३१,२२९ तर मुबंई उपनगरमध्ये ८५,६९४ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची मुंबई या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही ७०,५१३ इतकी होती.

कोकण मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या १७,७५१० इतकी असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही  ३६,४०७ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यत रोजीची  एकूण मतदारसंख्या २,१३,९१७ इतकी आहे. यामध्ये पालघर मध्ये २५,११५  तर ठाण्या मध्ये ९५,०८३रायगडमध्ये ५३,५४३रत्नागिरी २२,२०५, सिंधुदुर्ग १७,९७१  इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १,०४,४८८ इतकी होती.

राज्यसभेवरील रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडणुकीबाबत

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने दि. २७ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम घोषित केला आह. दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे पद रिक्त झाले असून या पदाचा कालावधी दि. ४ जूलै, २०२८ पर्यंत  होता.या रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरवारदि. ६ जून २०२४ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक)नामनिर्दैशन पत्र दाखल करण्याचा अतिम दिनांक दि.१३ जून, २०२४, गुरवार आहे. दि.१४ जून २०२४, शुक्रवार रोजी नामनिर्दैशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि.१८ जून, २०२४, मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहील.

मतदानाचा दिनांक २५ जून, २०२४ मंगळवार असून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. दि.२५ जून मंगळवार रोजी सायं.५ वा. मतमोजणी केल्या जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवारदि. २८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या निवडणूकीसाठी जितेंद्र भोळे, सचिव, (१) प्रभारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी दिली.

0 0 0 0 0 0 0 0 0

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट



जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची 

जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जळगाव, दिनांक 29 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट देवून मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी ॲानलाईन लिंकद्वारे व्हिसीवर ईमुलाखत सुविधा, प्रत्यक्ष भेटीची मुलाखत रूम, लायब्ररी व ईलायब्ररी, २० नग ५० टिव्हीसंच, ०५ नग वॅाटरकुलर, बंदी विनंती, कोर्टपेशीसाठी पोलीस पथक, स्वच्छता, दवाखाना औषधोपचार, हॅाटपॅाटसह स्वयंपाकगृहातील जेवन ई पाहणी करून निरीक्षण केले. 

तसेच जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते १० बंद्याना वैद्यकिय सुविधेसाठी आयुषमान भारत कार्डचे वाटप करणेत आले. व जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनानुसार डिपीडीसीअंतर्गत नविन महिला विभागातील २ बॅरेक, पुरूष विभागातील २ बॅरेक, तृतियपंथीसाठी २ बॅरेक, कपडागोदाम, व्हिसी रूम, अंतर्गत सिमेंट रस्ता, जनरेटर शेड , मेनगेटसमोरील पेव्हर ब्लाकचे सुशोभीकरन, पाकगृह शेड, कार्यालयाची रंगरंगोटी, तटभिंत ५  तार फेंसींगसह वाढीव बांधकामाची पाहणी केली व सदर पाहणी व निरीक्षणा वेळी अधिक्षक जळगाव जेल, वांढेकर, तुरूंग अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते .

0 0 0 0 0 0 0 0

विविध पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके ; विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार

 विविध पिकांसाठी बीजप्रक्रिया  प्रात्यक्षिके ; 

विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार

जळगाव, दिनांक 29 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा)

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सन 2023-24 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होतो. जिल्हयात विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, गाव बैठका इ. च्या माध्यमातून वीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुषंगाने सन 2024-25  प्रकल्पांतर्गत खरीप  हंगामामध्ये जिल्हयात ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद व मूग या प्रमुख पिकांसाठी बीजप्रक्रिया  प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक यांच्या कार्यक्षेत्रात विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. 

जमीनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/ विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया  है अत्यंत प्रभावी साधन आहे बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वताचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सन 2023-24 मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयाबीन पिकावर मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. सदर रोगांमुळे शेतक-यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरीता बीजप्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वत:कडील घरगुती वापरण्यात येणान्या बियाण्यास बोजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रिया युक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य / विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे

बीजप्रक्रिया करण्याचे फायदे:

बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते, जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणी पासून 30-35 दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो,  कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते, बियाण्याची उगवण क्षमता वाढवते, जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात, उत्पादनात वाढ होते.

बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजीः

 बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या इतर संरक्षण करणान्या बाबी घालाव्यात, बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किया यंत्राद्वारे सावलीत कराव. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवि मध्ये एकत्र मिसळून घ्यावे,  रासायनिक आणि जेविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत, जैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीजप्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये 2.5-3  तासाचे अंतर असावे,. बीजप्रक्रिया केलेले बियाणे 3-4 तासाच्या आत पेरणी साठी वापरावे, बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी.   

000000

सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह जळगांव येथील शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

        सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृह जळगांव येथील शैक्षणिक वर्ष         2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया पात्रधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 29 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा)

समस्त माजी सैनिक/विधवांना कळविण्यात येते की, जळगांव मध्ये सैनिकी मुलांचे वसतिगृह, मध्यवती शिवाजी पुतळयाजवळील, जी.एस मैदान, जळगाव येथे असून सदर वसतीगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सेनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगांव येथे असून सदर वसतीगृहामध्ये सुद्धा एकूण 48 मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगांव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगांव येथे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. 

माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहील्यास इतर नागरिक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका/अर्ज वसतीगृह अधिक्षक/अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक / अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका/अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक 31 ऑगष्ट 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार, जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रा. गायकवाड, , मो. नं. ८४५९६८७३८८ दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४. अशासकीय वसतीगृह अधिक्षक  समाधान धनगर, मो. नं. ७३७८९४२३२७ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८. अशासकीय वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील, मो. नं. ७५०७९०३९२१ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७- २२४१४१४.

000000000

खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची लागवड करा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

                     खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची                                     लागवड करा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जळगाव, दिनांक 29 मे, 2024 (जिमाका वृत्तसेवा)

जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांचा अनूभव लक्षात घेता कापूस पिकात किडींचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उत्पादन खर्चात ३० टक्के वाढ झालेली असल्याने अपेक्षित उत्पादन येवून देखील उत्पादन खर्च जास्त झाल्याने शेतक-याच्या नफ्यात घट झालेली दिसुन येते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस पिकात आंतरपिक म्हणून तुर, मुग व उडीद या पिकांचा समावेश करावा. जेणे करुन जमिनीतील सुपिकता निर्देशांकात वाढ व एकात्मिक किड व्यवस्थापन (गुलाबी बोंड अळी) या सारख्या किंडींचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होते. तसेच कापूस पिकात आंतरपिक म्हणून कडधान्याचा समावेश केल्याने जमिनीची धूप कमी होणे, उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते त्यामुळे आंतर पीक घेण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्हाची दाळ मिल नगरी म्हणून ओळख असल्याने जळगाव शहरात ९४ दाळ मिल कार्यान्वित असल्याने दाळ प्रक्रीया उद्योग वाढीसाठी वाव आहे. त्याचबरोबर विविध शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांना हमी भाव मिळण्यास देखील हातभार लागणार आहे. शेतकरी बांधवांच्या हितार्थ जिल्हयात कृषि विभागानार्फत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियन अंतर्गत तुर, मुग व उडीद पिकाचे प्रात्यक्षिक व बियाणे तालुकास्तरावर अनुदान तत्वावर कडधान्य पिकांचे बियाणे मिळणार असुन जास्तीतजास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0

पशुधनाची उष्णलहरी पासून करा बचाव...!!

 पशुधनाची उष्णलहरी पासून करा बचाव...!!

▪️ अशा आहेत उपाययोजना

१. पशुधनास फ्रक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे,उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे.

२. पशुधनाची वाहतुक फक्त सकाळी व संध्याकाळी करावी. दुपारी ११ ते ४ याजेपर्यंत वाहतुक करु नये.

३. उन्हाळा संपेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये,

४. पशुधनासाठी स्वच्छ व थंड पिण्याची पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद गोठ्याजवळ व सावलीत असावेत.

५. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध करुन द्यावा,

६. पशुपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा जास्तीत जास्त वापर करावा व गोठ्यात स्प्रिंकलर वापरावे.

७. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतोदिवसा ११ ते ४ वाजेपर्यंत) वेळी विश्रांती द्यावी. बैलांना दुपारी कामास जुंपु नये.

८. पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा/वैरण द्यावे.

९. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलर / फॉगर ची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारावे तसेच शक्य असल्यास फॅन/कुलर लावावेत.

१०. पशुखाद्य देतांना पुरेसेक्षार व जिवनसत्वे मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.

११. पशुधनास उघड्यावर बांधु नये किंवा पार्क केलेल्या गाडीत सोडुन जाऊ नये.

१२. पशुधनाची गर्दी करु नये व दाटीवाटीने बांधु नये. विरळ विरळ बांधावीत

१३. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फ़ार दुर व फ़ार वेळ चालावे लागु नये याची दक्षता घ्यावी.

१४. मुक्त संचार गोठा रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडुन अनुदानातुन अवलंब करण्यात यावा.

१५. निकृष्ठ चा-याची पौष्टीकता वाढविण्यासाठी चा-यावर पशुवैद्यकांच्या सल्याने ३-५ टक्के युरीया व मोर्लेसेस प्रक्रिया करण्यात यावी

१६. जनावरांना कडबा पेंडी ऐवजी चाफ कटर च्या सहाय्याने कुटटी करुन त्याचा वापर करावा, जेणेकरुन चारा वाया जाणार नाही

१७. पावसाच्या पाण्याने भिजलेला चारा काळा पडल्यास / खराब झाल्यास त्यावर चुन्याची निवडी (१ किलो चुना २० लि पाणी/२०० किलो चारा टॉक्सीन बाईडर १ किलो/टन चा वापर करावा.

१८. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत दुध उत्पादक पशुपालकांना पशुधन विषयक कर्ज मर्यादा १.६० लक्ष आहे. या योजनेमध्ये कर्जावरील व्याजदरामध्ये २ टक्के पर्यंत सवलत राहिल आहे. सदर योजना कोणत्याही पशुधन खरेदीसाठी नसुन त्यांच्या व्यवस्थापनावरील खर्चासाठी आहे.

ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन पालकांसाठी प्रसारित करण्यात  येत आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 

Tuesday, 28 May 2024

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ, विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

                                        नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ
                विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

 जळगाव, दिनांक २८ मे, २०२४ (विमाका वृत्तसेवा) :

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  निवडणुकीबाबत काही तक्रारी व शंका असल्यास नागरिकांनी ०२५३- २४६९४१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नायब तहसीलदार (रोहयो) तथा आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी विवेक उपासनी यांनी कळविले आहे. वरील दूरध्वनी क्रमांकावर नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील नागरीक आपली तक्रार  नोंदवू शकतात.

0 0 0 0 0 0

Monday, 27 May 2024

जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात ; मिळत नसतील तर तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

             जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात ; 
             मिळत नसतील तर तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

जळगाव, दिनांक 27 मे, (जिमाका वृत्तसेवा) :   खरीप हंगाम 2024 अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा कृषी निवष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर चे शुभारंभ करण्यात आले. 

सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी उपस्थित होते. टोल फ्री क्रमांक 7498192221 या क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या 0257-2239054 व 9834684620 यापैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर तक्रारग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्ध होत नसल्यास किंवा खते उपलब्ध होत असल्यास याबाबत कुठली तक्रार असल्यास सदर क्रमांक वर कॉल करावा त्या   ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळेल व आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना करण्यात येतील असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सुरज जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

० ० ० ० ० ० ०

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

                     भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी 
                     पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

जळगाव, दिनांक 27 मे, (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलसमध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना  Combined Defence Service (SDS)   या परिक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराट्रातील नवयुवक व नव युवतीसाठी दिनांक 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट, 2024 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते.

तरी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 6 जून, 2024 रोजी मुलाखतीस हजर राहावे, मुलाखतीस येते वेळी त्यांनी  Department of Sainik Welfare, Pune( DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS - 63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर सि. डी. एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्या संबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत – उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सि. डी. एस (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ईमेल आय डी  training.petcnashik@gmail,com  व दुरध्वनी  क्रमांक 0253-245 1032 किंवा व्हाटसॲप क्रमांक 9156073306 (प्रवेशपत्र मिळवण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

0 0 0 0 0 0

Friday, 24 May 2024

म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेता वर धडक कारवाई

                            म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस 

                                बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेता वर धडक कारवाई

जळगाव, दिनांक 24 मे, (जिमाका वृत्तसेवा) : कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा ,विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाईकामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. 

सदर कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील श्री सुरज जगताप कृषी विकास अधिकारी ,श्री विजय पवार मोहीम अधिकारी ,श्री विकास बोरसे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक ,श्री धीरज बडे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते .

कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी दिलेला असून शेतकऱ्यांनी ज्यादादाराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव,कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी. 

शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाच्या मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते. शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात आले.

0 0 0 0 0

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

                             विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाची

                    २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

 

मुंबईदिनांक २४ मे, : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ)निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे सदस्य दिनांक  ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर शुक्रवार७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार१० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार१२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Tuesday, 21 May 2024

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 21 मे, ( जिमाका वृत्तसेवा ) : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  ज्या मुलांनी वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात  विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज () https://awards.gov.in)  या संकेतस्थळ मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य  संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, असे आयुक्त महिला व बाल विकास  महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0 0 0 0 0 0 0

“भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकत वाढविण्यास शिफारशी” या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्याचे आवाहन

 

भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, 

उत्पादन व उत्पादकत वाढविण्यास शिफारशी या पुस्तिकेमध्ये सुधारणा सुचविण्याचे आवाहन

जळगाव, दिनांक 21 मे (जिमाका) : कृषी विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी ही पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर पुस्तिकेमध्ये भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांचे पेरणीपासून काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिकेच्या Draft चा क्यु आर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या मेलवर कळविण्यात याव्यात, असे आवाहन कृषि संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य  विकास पाटील पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

 

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या

निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

जळगाव, दिनांक 21 मे (जिमाका) : राज्यात अनुसुचित जमातीतील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणात प्रामुख्याने इंग्रजीचा वापर जास्त होत असल्याने अनुसूचित जमातीचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत आहेत व उच्च शिक्षणाच्या बदलेल्या वातावरणात त्यांना जुळवून घेणे कठीण जाते. जागतिकीकीणाच्या सध्याच्या वातावरणात इंग्रजीचे महत्व वाढत असून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमाकडे थोडया प्रमाणात वाढत असला तरी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण घेणे त्यांच्या आर्थिक कुवती पलीकडे आहे. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन 2024-25 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयामध्ये कार्यक्षेत्रातील जळगाव जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांना इयत्ता 1 ली व 2 री साठी विद्यार्थ्यांना सन 2024 – 25 मध्ये शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार व अटी – शर्तीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विहित नमुन्यातील अर्ज खालील ठिकाणी दिनांक 21 मे,2024 ते 10 जून, 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून जमा करण्यात यावेत

प्रवेश अर्ज जमा करण्याचे ठिकाण

 आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह – यावल/ भुसावळ, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर/ बोदवड, जामनेर, जळगाव/ धरणगाव, चाळीसगाव, एरंडोल/ पारोळा/ भडगाव/ पाचोरा, अमळनेर  या ठिकाणी सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत. या योजनेतंर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्यानंतर            इयत्ता 1 ली साठी जन्मदाखला ग्रामसेवक, इ. 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी किमान 6 वर्षे पूर्ण असावे, जन्म 1 जून, 2017 ते 31 डिसेंबर, 2018 या दरम्यान झालेला असावा.  इयत्ता 2 री साठी इयत्ता  1 ली मध्ये शिकत असल्याबाबत मुख्याध्यापकांची शिफारस, पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.00 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे तसेच पालक शासकीय / निमशासकीय सेवेत नसावे, उत्पन्नाचा दाखला प्रत जोडणे आवश्यक, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सन 2023-24, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ( सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले), दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करुन ग्रामसेवक यांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामसेवकाचा दाखला, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज दोन फोटो, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत, निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0 0 0 0 0 0 0

Friday, 17 May 2024

कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध, कृषी विभागाची माहिती

 कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध,  कृषी विभागाची माहिती


जळगाव, दिनांक 17 मे,  (जिमाका वृत्त) :  जळगांव जिल्हयात शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, खरीप हंगामात कापुस बियाणे लागवडीसाठी २७.९२ लाख पाकीटांची आवश्यक्ता असुन लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध होणार आहे.

पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत देशात जनुकीय बदल करुन तयार करण्यात येणाऱ्या बियाण्यांसाठी उत्पादन विक्री व हाताळणी करिता मान्यता देण्यात येत आहे. अशा मान्यता प्राप्त जनुकीय बदल बियाणांची विक्री करण्याकरीता राज्यात बियाणे विक्री परवाना देण्यात येतो. तथापि बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे (Herbicidal Tolerance Transgenic Gene) एचटीबीटी कापुस बियाणे विक्री करण्यास GEAC (Genetically Engineering Approval Committee) यांनी परवानगी दिलेली नाही.

खरीप हंगाम २०२४ मध्ये जिल्हयात प्रतिबंधित HTBT  या कापुस वाणाची लागवड व सीमेलगतच्या राज्यातुन होणारी छुपी विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथक व तालुकास्तरीय भरारी पथकांची निर्मिती करुन मोहिम स्वरुपात कृषि केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे.

तालुक्यातील कृषि मित्र, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, कृषि अधिकारी, गावातील पोलीस पाटील, प्रगतीशील शेतकरी यांचेशी जिल्हयातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षक संपर्कात असुन असा प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवण्यात येईल.

एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२४ मध्ये सदर बियाणे कोणत्याही परिस्थीतीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये. अशा प्रकारचे कापूस बियाणे विक्री करीत असतांना आढळुन आल्यास संबंधीतांवर कृषि विभागामार्फत पर्यावरवण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कायद्याअन्वये पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येईल.

तसेच जिल्हयात या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ व मोबाईल क्र. ९८३४६८४६२० वर माहिती द्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कु.मु. तडवी यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी आणि ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी आणि ए व

सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा


जळगाव, दिनांक 17 मे,  (जिमाका वृत्त) :  २४ ते २६ मे, २०२४ रोजी जळगांव केंद्रावर सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगांव जिल्हा पेठ, स्टेट बैंक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगांव या केंद्रावर घेणेंत येणार आहे. तरी ज्या परिक्षार्थीनी सदर परिक्षेचे अर्ज केलेले आहेत अशा परिक्षार्थीनी आपले परीक्षा प्रवेशपत्र खात्याच्या संकेतस्थळावरुन (Website) आपण तयार केलेल्या लॉगईन आयडीवरून उपलब्ध करून घ्यावे. तसेच सदरबाबत परीक्षार्थीना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, गौतम बलसाणे, सहकारी संस्था, जळगांव यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0 0 0 0 0 0

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

जळगाव, दिनांक 17 मे, (जिमाका वृत्त) :  जिल्हयातील नागरिकांना कळविण्यात येते कि, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि.16 मे, 2024 रोजी पासुन तांत्रीक अडचण आल्याने बंद झालेले आहे. सदर प्रणाली मेंटनेन्स कामाकरीता दि. 18 मे, 2024 पर्यंत बंद असल्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी अनुज्ञप्ती संबधीचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर त्याबाबत कळविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

0 0 0 0 0 0

Thursday, 2 May 2024

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन ; सर्वांना दिल्या शुभेच्छा



 महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन ; सर्वांना दिल्या शुभेच्छा


जळगाव, दिनांक 1 ( जिमाका ) : महाराष्ट्र राज्याच्या  65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना प्रथम अभिवादन करून पालकमंत्री म्हणाले, राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून  महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांचीही भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य असल्याची भावनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनविन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार कामगार दिनाच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

0 0 0 0 0 0 0 0 0