Thursday, 28 March 2024

जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर - जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

 

जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात वोट कर - जळगाव कर

 मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

जळगाव, दिनांक 28 मार्च, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.

या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन वोट कर जळगांव कर या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली.  यावेळी 'रेडिओ जॅकी' शिवानी यांनी वोट कर - जळगांव कर, चुनाव का पर्व देश का गर्व 'माझे मत- माझे भविष्य, मतदार राजा जागा हो -लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी-मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा-मतदानच आहे उद्याची आशा अशा विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी उपस्थित 'रेडिओ जॅकी'देवा यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवलं नसेल तर तात्काळ नाव नोंदवा, इतर मतदारांनाही नाव नोंदणीसाठी प्रेरित करा ,मतदानाप्रती नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून देश हितासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शेवटी सर्व उपस्थितांना लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.

 

00000

जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांसाठी शासनाच्या ई-कुबेर प्रणालीची सुविधा

                                            जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांसाठी

शासनाच्या ई-कुबेर प्रणालीची सुविधा

 जळगाव, दिनांक 28 मार्च, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :

जळगाव जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.

 पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी या कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शन धारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.

 तरी ज्या पेन्शन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-2024 या महिन्याचे मासिक पेन्शन हे दिनांक 10 एप्रिल, 2024 पर्यंत जमा होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जळगावचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


                                                                       0 0 0 0

Wednesday, 27 March 2024

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु

        जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु

जळगाव दिनांक 27 (जिमाका) : 

जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली असून त्यात शस्त्र जप्ती,रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे.

शस्त्र जप्ती

जिल्ह्यात एकूण 1246 परवनाधारक शस्त्र आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि.26 मार्च रोजी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 05  विनापरवानाशस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत 1 हजार 73 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सी आर पी सी अंतर्गत आतापर्यंत 786 जणांना अटक करण्यात आली आहे.

दारूबंदी

आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे.

1. एकूण गुन्हे - 78

2. जप्त मुद्देमाल (लिटर)- 33506.18

3. जप्त मुद्देमाल किंमत (रू) - 11,69,825

सार्वजनिक तक्रार निवारण:

व्होटर हेल्पलाइनद्वारे प्राप्त झालेल्या 53 कॉलचे समाधान करण्यात आले आहे. एकूण 53 कॉल निकाली काढण्यात आले आहेत. वोटर हेल्पलाइन वर प्राप्त होणाऱ्या कॉल्स पैकी बहुतांश तक्रार या मतदान कार्ड न मिळाल्याबाबतीत असल्याने कॉल करणाऱ्या नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.

CVIGIL:

CVIGIL अर्जाद्वारे 34 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रमुख तक्रारी परवानगीशिवाय पोस्टर्स/बॅनरशी संबंधित आहेत. प्राप्त बहुतांशी तक्रारी या ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर बॅनर्स वॉल पेंटिंग याच्याशी संबंधित असल्याने संबंधित प्राप्त तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांना सुचित करण्यात आले आहे.

मीडिया:

आता पर्यंत  एकूण 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

एन्कोर (ENCORE) अँप

ENCORE अंतर्गत  परवानग्यांसाठी 01अर्ज प्राप्त झाला होता तथापि अर्जासंदर्भात त्रुटी पूर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.

                                                            0 0 0 0 0 0

पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

  • पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ 
 जळगाव, दिनांक 27 मार्च, 2024 ( जिमाका वृत्तसेवा) : 

पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे SEBC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल, 2024 पर्यंत करण्यात येत आहे. 

अंतिम दिनांकापुर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाची पोचपावतीसह अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, असे आवाहन राजकुमार व्हटकर, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र्र राज्य, मुंबई यांनी केले आहे. 

                                                                            0 0 0 0 0

Tuesday, 26 March 2024

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

            कामगारअधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

मुंबईदिनांक 26 : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगारअधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दिनांक १९ एप्रिलदिनांक २६ एप्रिलदिनांक ७ मेदिनांक १३ मे व दिनांक २० मे२०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगारअधिकारीकर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीहीत्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यासत्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहेअशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.

0 0 0 0 0 0 0

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

                         एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव,  दिनांक 26 मार्च, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) : 

जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024 पासून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात पहिल्या सोमवारी (01 एप्रिल, 2024) होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                                          0 0 0 0 0 

                                          लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी

 आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर

 

जळगाव,  दिनांक 26 मार्च, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) :

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.


जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा

            उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे.  त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला,भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खाजगी संस्था यांच्या मालकीची जागा/ मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमती पत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्टर्स झेंडे, कापडी बॅनर

            सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे.  परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावतीआवश्यक आहे.

खाजगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे

            खाजगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खाजगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी,व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

प्रचार वाहन परवानगी

            प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.

उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय

            उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी

            संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ध्वनीक्षेपकाची परवानगी

            प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते.त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

शाळेच्या मैदानावरील सभा

            संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी  उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती

            उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर ( शेवटचे 48 तास ) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे.त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.

फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग्स, बॅनर व पोस्टर

            संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे,पोस्टर,बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोडशो

            उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.

0 0 0 0 0

Friday, 22 March 2024

राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न

                    राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व 

                संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न 

मुंबई, दिनांक 21 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपीलीय समितीची Media Certification and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय अपिलीय समितीच्या आढावा बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. 

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (MCMC) गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यस्तरावर सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण समिती (State Level Certification Committee) स्थापन करण्यात आलेली आहे. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या निर्णयांविरुध्दचे अपील तसेच पेड न्यूज संदर्भात दाखल झालेल्या प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी राज्यस्तरावर एस चोक्कलिंगम (भाप्रसे), प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती Media Certifiaction and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] गठीत करण्यात आलेली आहे. 
 
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व उमेदवार निवडणूक प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर करीत असतात. यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे, जाहिरात फलक तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांचा समावेश असतो. या सर्व माध्यमांचा वापर तसेच त्यासाठी येणाऱ्या खर्चावर सनियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. नामनिर्देशनापासून ते मतदानाच्या दिनांकापर्यंत उमेदवाराकडून वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रचार साहित्यावर निवडणूक आयोगाची नजर असणार असून कुठल्याही मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यासंदर्भातील काम तसेच विनाप्रमाणीकरण प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, पेडन्यूज याबाबत समितीचे नियंत्रण व देखरेख असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने विविध निर्देश दिले आहेत. 

आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून आचारसंहिता काळात केले जाणार नाही, यासाठीचे नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे राज्यस्तरीय एमसीएमसी अपिलीय समितीच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करुन श्री.चोक्कलिंगम यांनी समितीच्या कार्यकक्षेतील सर्व बाबीची कार्यवाही तत्पर आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

                                                            0 0 0 0 0 0

Thursday, 21 March 2024

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

                                        आचारसंहितेचे उल्लंघन होतेय मगसीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

·       पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

·       भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

मुंबई, दिनांक २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. 

चारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा 

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख 

या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ 

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

0 0 0 0 0 0

Wednesday, 20 March 2024

कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र

          कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,
     रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

जळगाव, दिनांक 20 मार्च, 2024 (वृत्तसेवा जिमाका) :

आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता   1 एप्रिल,2024 ते 15 जुलै, 2024 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी अटी :

उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा. वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स,  दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला  इ. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे प्रत्यक्ष 10 ते 2 वाजेपर्यंत सपर्क साधावा.

तसेच  प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल, मुलाखत दिनांक 28 मार्च, 2024 राहिल, संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक 02584-251906, भ्रमणध्वनी क्रमांक 8668817893 असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अमिन तडवी, रावेर यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 

                                                                  0 0 0 0 0 0 

जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर 19 लाख 81,472 मतदार

 

जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर 19 लाख 81,472 मतदार नोंद तर

रावेर मध्ये 18 लाख 11,951 एवढी नोंद

दोन्ही मतदार संघातील पुरुष मतदार 19,68,114, 

स्त्रिया- 18,25,172 तर तृतीय पंथी 137

 

जळगाव,  दिनांक 20 मार्च  ( जिमाका वृत्तसेवा ) :

जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख,81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

 जळगावं लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 10 लाख 31 हजार 60 एवढी असून स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 83 आहेत. अशी सर्व मिळून 19 लाख 81 हजार 472 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे.

 जळगांव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 207019 स्त्रीयांची संख्या-188113, तृतीय पंथी संख्या 32 असे एकुण 395164 मतदार आहेत. जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 1,66330 स्त्रीयांची संख्या- 1,55302 तृतीय पंथी संख्या -03 असे एकुण 321635 मतदार आहेत.

अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 155220 स्त्रीयांची संख्या-146010 तृतीय पंथी संख्या 3 असे एकुण 301233 मतदार आहेत.

एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 147479, स्त्रियांची संख्या 138322 तर तृतीय पंथी संख्या 10 असे एकुण 285811 मतदार आहेत.

चाळीसगांव विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 189801, स्त्रीयांची संख्या- 169851 तृतीय पंथी संख्या -29 असे एकुण 359681   मतदार आहेत.

पाचोरा विधानसभा  मतदार संघात पुरुष संख्या 165211 स्त्रीयांची संख्या - 152731 तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 317948 मतदार आहेत.

 रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 54 आहेत. अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे.

चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या 164152, स्त्रीयांची संख्या- 156584, तृतीय पंथी संख्या 02 असे एकुण 320738 मतदार आहेत.

रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या 153883, स्त्रीयांची संख्या- 144447, तृतीय पंथी संख्या -02 असे एकुण 298332 मतदार आहेत.

भुसावळ (एससी ) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या-154058 स्त्रीयांची संख्या-143539 तृतीय पंथी संख्या 37 असे एकुण 297634 मतदार आहेत.

जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या166837,स्त्रीयांची संख्या- 154519, तृतीय पंथी संख्या -00 असे एकुण 321356 मतदार आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 151628, स्त्रियांची संख्या 142683, तृतीय पंथी संख्या-07 असे एकुण 294318 मतदार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर  विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तेथील पुरुष संख्या 146496 स्त्रीयांची संख्या- 133071, तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 279573 मतदार आहेत.

असे एकत्रित दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकुण पुरुष संख्या 1968114, एकुण स्त्रीयांची संख्या-1825172, एकुण तृतीय पंथी संख्या 137 असे एकुण 3793423 मतदार आहेत.

0 0 0 0

Tuesday, 19 March 2024

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

                                        जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ;

काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव, दिनांक 18 मार्च ( वृत्तसेवा जिमाका ) :

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट-1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.

अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक व चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट-1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.

0 0 0 0 0

Friday, 15 March 2024

भूमीअभिलेख विभागासाठीच्या १५ रोवर मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप रोवर युनिट मशीनमुळे जिल्ह्यातील जमीन मोजणी होणार अधिक जलदगतीने‎ - पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪ जमिनीची मोजणी करतांना येणार अचूकता आणि पारदर्शकता, तंटे मिटणार


भूमीअभिलेख विभागासाठीच्या १५ रोवर मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप  
रोवर युनिट मशीनमुळे जिल्ह्यातील जमीन मोजणी होणार अधिक जलदगतीने‎ 
                                                                        -- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जमिनीची मोजणी करतांना  येणार अचूकता आणि पारदर्शकता, तंटे मिटणार

जळगाव, दिनांक 14 मार्च, 2024 (वृत्तसेवा जिमाका) :

भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे  शेत जमीन मोजणी  तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप  याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे.  बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथील नगरपालिका सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी रोव्हर मशीन वाटपा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर, उपअधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे,नगर भुमापन अधिकारी पी. एस.पाटील उपस्थित होते.
            
जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि भूमिअभिलेख कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशीन वाटप करण्यात आल्या. यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोज मधून तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षी १२ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे भूमिअभिलेख कार्यालयास देण्यात आली आहेत.  यासाठी १ कोटी २० लाख निधी खर्च केले गेला होता. 

भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या अभिलेख्यांचे जतन करण्यासह नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या जमिनींचे मापन करण्यात येते. यात हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती, ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख तयार केले जातात. आजवर या सर्व प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक पद्धतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर लागतेच पण अनेक ठिकाणी झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे जमीन मोजणीत मोठ्या अडचणी येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे.

रोवर मशीनमुळे मोजणी करतांना  येणार अचूकता आणि पारदर्शकता
रोव्हर मशीनमुळे तास किंवा काही मिनिटाच्या आत मोजणी काम करता येते. मागील वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन (DPDC) मार्फत  हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.

प्रास्ताविकात  जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उप अधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे यांनी केले. तर आभार  पी. एस.पाटील , नगर भुमापन अधिकारी यांनी मानले.
            
या कार्यक्रमाला मनोज चव्हाण, रतिलाल शिरसाठ, नुपम मेढे, कृष्णा भट, संजय सोनार, रोहिदास चव्हाण, विजय पाटील, रवींद्र महाजन, सुरेश वाडे  प्रशांत कोळेकर, गोपाळ पाटील रवींद्र कदम, जिल्ह्यातील अन्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                    0 0 0 0 0

Thursday, 14 March 2024

असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ; जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

 असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ;  जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

जळगाव, दिनांक 14 मार्च, 2024 (वृत्तसेवा जिमाका) :

जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ठिकाणी जावून त्यांनी परीक्षा दयावयाची आहे. जिल्हयातील एकूण 57608 नव साक्षर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. त्यापैकी स्त्रियांची संख्या ही 41253, पुरुष संख्या ही 16349 व 06 ट्रान्सजेंडर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. सदर कार्यक्रमात केंद्रसरकार पुरस्कृत असून, यात मोठया संख्येने सर्व नव साक्षर व्यक्तीने उपस्थित राहून, परीक्षा दयावी असे आवाहन, शिक्षणाधिकारी  (माध्य) जिल्हा परीषद कल्पना चव्हाण यांनी केले आहे.

0 0 0 0 0 0

‘यशवंत पंचायत राज’ व ‘अमृत महा आवास अभियान’ पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संपन्न अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त

    ‘यशवंत पंचायत राज’ व ‘अमृत महा आवास अभियान’ पुरस्कार वितरण  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संपन्न

अहमदनगर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त


नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (विमाका वृत्तसेवा):

विभाग स्तर व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीं साठी ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत सन 2020-21, 2022-23 कालावधीत अत्युकृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ‘अमृत महा आवास अभियान’तही चांगले काम करुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांचा सन्मान श्री.गमे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला  संपन्न झाले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘अमृत महा आवास अभियान’व ‘यशवंत पंचायत राज’  पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अर्जुन गुंडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपायुक्त ( विकास) उज्ज्वला बावके, महसूल प्रबोधनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ, सहा आयुक्त मनोज चौधर,  प्रकल्प संचालक, गटविकास  अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच , पुरस्कार प्राप्त संस्था व पुरस्कार्थी उपस्थित होते.

अमृत महाआवास अभियानात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक व राज्य पुरस्कृत योजनेत ही प्रथम क्रमांक मिळाला अहमदनगर जिल्ह्यास बारा मानांकनात एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल विभागीय आयुक्त नाशिक यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विशेष कौतुक केले.

पुरस्कार:
यशवंत पंचायत राज अभियान राज्य स्तर पुरस्कार सन 2022-23
अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहता येथील पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाचे रुपये 15 लाखाचे बक्षिस मिळाले.

यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2020-21
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, नाशिक द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, कळवण जि.नाशिक तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख

यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर पुरस्कार सन 2022-23
1. पंचायत समिती, राहता जि.अहमदनगर प्रथम क्रमांक, बक्षिस रुपये 11 लाख
2. पंचायत समिती, पारोळा जि.जळगाव द्वितीय क्रमांक, बक्षिस रुपये 8 लाख
3. पंचायत समिती, संगमनेर जि.अहमदनगर तृतीय क्रमांक, बक्षिस रुपये 6 लाख

गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2019-20
प्रदीप काशिनाथ वर्पे,सहायक लेखाधिकारी, जि.प.अहमदनगर, श्री. एकनाथ ढाकणे, ग्रामविकास अधिकारी, जि.प.अहमदनगर, अजय चौधरी, आरोग्य पर्यवेक्षक, जि.प.जळगाव, श्री. समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी, पं.स.राहाता. जि.अहमदनगर, . इंद्रसिंग राजपूत, विस्तार अधिकारी,सांख्यिकी, जि.प.नंदूरबार, अंबादास पाटील वरिष्ठ सहायक, जि.प.नाशिक

गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार : सन 2020-21
 मनोज आहिरराव, वरिष्ठ सहायक, जि.प.नंदूरबार., विलास बोंडे विस्तार अधिकारी,सांख्यिकी, जि.प.जळगाव, . सतिष सिसोदे, शाखा अभियंता, जि.प. जळगाव, . अशोक कदम, वरिष्ठ सहायक, जि.प.अहमदनगर, प्रदीप आहिरे, वरिष्ठ सहायक, जि.प.नाशिक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: धुळे जिल्हा

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.पाथर्डी जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.जामनेर, जि.जळगाव
तृतीय क्रमांक: ता.कर्जत जि.अहमदनगर


प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं. मालेवाडी  ता.पाथर्डी  जि. अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.कुशेगाव ता.इगतपुरी, जि.नाशिक
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. नागोसली, ता.इगतपुरी, जि.नाशिक

विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. हनुमंत खेडे, ता.धरणगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. भोलाणे, ता.पारोळा, जि. जळगाव
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. सुपे, ता.कर्जत, जि.अहमदनगर

विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अपार्टमेंट)
प्रथम क्रमांक :-ग्रा.पं. उपखेड, ता.चाळीसगाव, जि. जळगाव
द्वितीय क्रमांक :-ग्रा.पं. वागदरी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं. कोळपिंपरी, ता.पारोळा, जि.जळगाव

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता. जामनेर. जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ता.निफाड, जि. नाशिक
तृतीय क्रमांक: ता.नांदगाव, जि. नाशिक

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: अहमदनगर जिल्हा
द्वितीय क्रमांक: जळगाव जिल्हा
तृतीय क्रमांक: नंदूरबार जिल्हा

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: ता.जामखेड  जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ता.शेवगाव, जि. अहमदनगर
तृतीय क्रमांक: ता.नेवासा, जि. अहमदनगर

राज्य पुरस्कृत आवासयोजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.अरणगाव ता.जामखेड  जि.अहमदनगर
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.गोलेगाव, ता.शेगाव जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.नागापूर, ता.नांदगाव, जि.नाशिक

राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत सर्वोत्कृष्ट शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके
प्रथम क्रमांक: ता.ईगतपुरी जि.नाशिक
द्वितीय क्रमांक: ता.बागलाण, जि. नाशिक
तृतीय क्रमांक:  ता.जळगाव, जि.जळगाव
 
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली गृहसंकुल
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.निंभारा, ता.धरणगाव,  जि.जळगाव
द्वितीय क्रमांक: ग्रा.पं.शिरसगाव, ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर
तृतीय क्रमांक: ग्रा.पं.अंतापूर, ता.बागलाण, जि.नाशिक
 
राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गेत विभागातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुल (हाऊसिंग अर्पामेंट)
प्रथम क्रमांक: ग्रा.पं.नांदगाव, जि.अहमदनगर
0 0 0 0 0