Friday, 31 May 2013

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेऊन कार्य करावे- जिल्हाधिकारी राजूरकर



               जळगांव, दि. 31 :- जिल्हयात अतिवृष्टीमुळे निर्माण होणा-या आपतकालीन प्रसंगी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, संरक्षण विभाग व इतर विभागांनी आपसात योग्य समन्वय ठेऊन परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला करावा असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज मान्सूनपूर्व आपतकालीन पूर्व तयारी बैठकीत केले.
                नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मान्सूनपूर्व नियोजन व प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी करावयाच्या उपाययोजना आणि आपत्ती नंतरच्या काळात पार पाडावयाची कामे याबाबत जिल्हयाती विविध यंत्रणांनी केलेल्या नियोजनाचे सखोल आढावा जिल्हाधिका-यांना आज घेतला यात प्रामुख्याने पाटबंधारे विभाग, जळगांव महानगर पालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, होमगार्ड, जिल्हा शल्यचिकित्सक, राज्य विद्युत मंडळ, जिल्हा प्रकल्प अधिकारी, मिलीटरी स्टेशन भुसावळ यांनी आपल्या विभागांशी संबंधीत पूर्व तयारी बाबत  माहिती दिली.
              बैठकीत आपत्ती निवारणाचे सादरीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ यांनी केले व प्रास्ताविक निवासी उपजिल्हधिकारी धनंजय निकम यांनी केले. बैठकीस जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा पोलिस प्रमुख एस. जयकुमार , होमगार्ड समादेशक डॉ. राजेंद्र भालोदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन कुलकर्णी, मिलीटरी स्टेशन भुसावळचे उबगणे, पाटबंधारे विभागाचे अभियंता पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व नगर पालिकांचे मुख्यधिकारी उप‍स्थित होते.

Wednesday, 29 May 2013

मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु



     जळगावं, दिनांक - 29:- मागासवर्गीय  मुलांचे शासकीय वस्तीगृह , रावेर येथे माध्यमिक शाळेत व महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागासप्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांना सर्व सोयीसुविधा युक्त व नि:शुल्क इ. 7 वी पास आठवी साठी, 10 वी पास 11 वी साठी , 12 वी पास प्रथम वर्ष, कला, वाणिज्य, विज्ञान या वर्गातील विदयार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते 5.45 सुटटीचा दिवस सोडून निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत विहीत नमुन्‍यातील अर्ज सादर करावेत असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगांव यांच्या वतीने, अधिक्षक यांनी कळविले आहे. वस्तीगृहाचा पत्ता: गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह, बऱ्हाणपूर मार्गावर, व्ही.एस.नाईक महाविदयालयासमोर रावेर जिल्हा जळगाव.

Tuesday, 28 May 2013

चोपडा तालुक्यात कोतवाल पदांसाठी अर्ज करावे



             जळगांव, दि. 28 :- चोपडा तालुक्यातील कसबे चोपडा , खेडी बु., व वेले हया सजेत प्रत्येकी एक कोतवाल पद भरणेकामी त्या त्या सजेत समाविष्ट असलेल्या गावांचे रहिवासी असलेल्या व्यक्तींकडून विहीत टंकलिखीत नमुन्यात अर्ज मागविणेत आले आहेत.
         यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोतवाल पदासाठी मानधन रुपये 5000/- (अक्षरी रुपये पाच हजार ) + नियमाप्रमाणे धुलाई भत्ता मात्र राहिल. प्रवर्गानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. चोपडा शहर भटक्या जमाती (क), वेले भटक्या जमाती (ब), खेडी बु विमुक्त जाती (अ ).  

नाशिक येथे महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा परीक्षेचे आयोजन



            जळगांव, दि. 28 :- मा. संचालक , लेखा व कोषागारे , महाराष्ट्र राज्य , मुबंई यांच्या वतीने दिनांक 3 जून 2013 ते 7 जून 2013 या कालावधीत दुसरी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा परीक्षा गट – क सेवा विभागीय परीक्षा मे – जून 2013 व 45 वी सेवा प्रवेशोत्तर (लिपीकवर्गीय ) परीक्षा माहे मे 2013 या परीक्षेचे आयोजन नाशिक शहरातील मा. मुख्याध्यापक , श्री. डायाभाई देवसी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , नाशिक , जिल्हा न्यायालयासमोर, जुना आग्रा रोड , नाशिक 422 002. या परिक्षा केंद्रावर करण्यात आले आहे.
            सदरील परिक्षेसाठी परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी, परीक्षेचे वेळापत्रक व ओळखपत्राचा नमुना जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर व नंदुरबार येथे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. परिक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्या त्या जिल्हयातील कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचकडून परिक्षेचे वेळापत्रक व ओळखपत्राचा नमुना प्राप्त करुन घ्यावा व अधिकृत ओळखपत्रासह परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. स. न. औताडे , सहसंचालक, लेखा व कोषागारे , नाशिक विभाग नाशिक यांचे वतीने या जाहीर सुचनेव्दारे करण्यात येत आहे.

Monday, 27 May 2013

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2012 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन



जळगांव, दि.27 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.  2012 या वर्षाकरिता दिनांक  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2013 असा आहे.
            2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल.  स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. 
   या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्या
http://dgipr.maharashtra.gov.inतसेचमहाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही  उपलब्ध आहेत.
            या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन  माहिती  जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                                      0 0 0 0 0

पालकमंत्र्यांचा 31 मे रोजी जनता दरबार



       जळगांव, दि. 27 :- राज्याचे कृषी, परिवहनमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जनता दरबार दिनांक 31 मे रोजी 2013 रोजी सकाळी 10-00 वाजता पदमालय शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी  जनता दरबारात ‍आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन प्रशासनार्ते करण्यात येत आहे.

Friday, 24 May 2013

पालकमंत्री ना. देवकर यांचे हस्ते टॅकरचा लोकार्पण सोहळा


       जळगांव, दि. 24 :- जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर निधीतून प्रशासन 10 टॅकरची खरेदी करणार असून त्यापैकी 3 टॅकर प्रशासनाकडे आलेले आहेत. या टँकरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचे हस्ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.
        यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, नायब तहसिलदार अश्वीनकुमार पोतदार, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता बोरोले आदि उपस्थित होते.
          जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ पाणीपुरवठा करता यावा यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री ना. देवकर व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शासकीय टँकरची खरेदी करुन टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी 1 कोटी 50 लाखाच्या खर्चास मंजुरी दिली. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभाग 10 टँकरची खरेदी करणार आहे. त्यातील तीन टँकर आज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ज्या गावांना पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी तात्काळ पाणी पुरवठा केला जाणार आहे. टँकरची पाणी साठवण क्षमता 10 हजार लिटर इतकी आहे उर्वरित सात टँकर ही लवकरच प्राप्त होणार आहेत.

Thursday, 23 May 2013

बंद उदयोग घटकांसाठी विशेष अभय योजना



       जळगांव, दि. 23 :- महाराष्ट्र औदयोगिक धोरण 2013 नुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद उदयोग घटकासाठी विशेष अभय योजना (स्पेशल ॲम्नेस्टी स्कीम) शासन निर्णय क्र. एसआयसी – 2013 / प्र.क्र.51/13/उदयोग-10, दिनांक 2 मे 2013 अन्वये जाहीर करण्यात आलेली आहे.
          पुनरुज्जीवनक्ष्म नसलेल्या तसेच बंद घटकांची जमिनीसकटची स्थिर मालमत्ता वापरात येणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे जे उदयोग घटक खालील निकष पुर्ण करतील अशा उदयोग घटकांना विशेष अभय योजनेव्दारे सुलभ निर्गमन (इझी एक्झिट ॲप्शन) पर्याय उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
          एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार / दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उदयोग घटक, रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियांच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेला अदयोग घटक , उदयोग घटकाच्या व्यवस्थापनेत बदल होवून उदयोग घटक व्यवस्थित चालू रहावे.
      यासाठी वरील योजनेतंर्गत पात्र ठरणा-या उदयोग घटकाने राज्य शासनाची सर्व मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ केले जाईल सदर योजना ही शासनाची सर्व प्रकारची देणी म्हणजेच विक्रीकर विभाग, महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या थकबाकीची  मुळ रक्कम, व्याज व दंडव्याज इत्यादीसह जी रक्कम येईल ती थकबाकी समजण्यात येईल, सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांना देखील लागु असुन सदर योजना ही दिनांक 31 मार्च 2014 पर्यत सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तरी वरील प्रकारात मोडत असलेल्या उदयोग घटकांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. डी. जे. बागडे, प्र. महाव्यवस्थापक  जिल्हा उदयोग केंद्र , जळगांव यांनी केले आहे.

Wednesday, 22 May 2013

मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहात प्रवेश मिळणे सुरु



       जळगांव, 22 :- या निवेदनाव्दारे अनु. जाती, अनु. जमाती, वि. जा. भ. ज, वि. मा. प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय , अनाथ व अपंग या प्रवर्गाच्या बाहेर गावाहून ये – जा करुन ‍शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चोपडा रोड, अंमळनेर या वसतिगृहात सन 2013 – 14 या वर्षासाठी वर नमुद मागावर्गीय विदयार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहे.
       वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांनी अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रवेश अर्ज व प्रवेशाच्या अटी व नियम वसतिगृहाच्या कार्यालयात पाहावयास मिळतील.
         वसतिगृहात प्रवेश दिलेल्या विदयार्थ्यांना निवास, भोजन, लेखनसाहित्य, गणवेश इ. सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात.
           तरी वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांनी गृहपाल  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चोपडा रोड, गोशाळेसमोर, अमळनेर, जि. जळगांव येथे संपर्क साधावा असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अत्याधुनिक ई. टी. एस भूमी मोजणी यंत्रांचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते वाटप

      जळगांव, दि. 22 :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमीन मोजणी करण्यात येते पारंपारीक फलक यंत्रांच्या सहायाने मोजणी करतांना अनेक अडचणीस तोंड दयावे लागते काही मर्यादा देखील असल्याने मोजणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत राहातात विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत असे जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून भूमि अभिलेख कार्यालयासाठी उपलब्ध केलेल्या अनुदानातून 11 थेडोलाईट मशीन व 9 प्लॉटर वाटप आज सकाळी जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते जिल्हयातील उप अधीक्षक भूमिलेख कार्यालयास करण्यात आले या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी जिंतेद्र वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे आदि अधिकारी कार्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
              लेझर जंत्रज्ञानाचा वापर करुन ईलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीन तयार करण्यात आलेल्या आहे. कमी वेळ, कमी श्रमात, अचुक काम या मशीन व्दारे होणार असल्याने नागरीकांची चांगली सोय होणार आहेत. प्लॉटर मुळे अचूक सुबक जलद रितीने नकाशे नागरीकांना तयार करुन मिळणार आहे. एका मशीन साठी रु. 4 लाख 23 हजार 709 रुपये तर एका प्लॉटर साठी रु 2 लक्ष 48 हजार खर्च झालेला आहे. राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री श्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा विकास समितीतून 68 लक्ष 98 हजार 807 रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे या मशीन जिल्हयात उपलब्ध झाल्या असल्याचे प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भूषण मोहिते यांनी सागितले तसेच  यापूर्वी 4 मशीन जिल्हयात प्राप्त झालेल्या आहेत.

Tuesday, 21 May 2013

जिल्हाधिका-यांनी दिली दहशतवाद व हिंसाचारा विरोधी प्रतिज्ञा




         जळगांव, दि. 21 :- भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्य तिथी दहशतवाद व  हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो आज सकाळी 11 . 00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली  यानंतर उपस्थित अधिकारी     कर्मचा-यांनी पुष्पाजंली अर्पण केली.
         जिल्हाधिकारी श्री राजूरकर यांनी अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिसांचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा दिली.
                                                  प्रतिज्ञा
             आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरे विषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधू मध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये धोकयात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
          यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गद्रे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जितेंद्र वाघ, स्वाती थविल, दीपमाला चौरे, तहसिलदार हेमलता बढे, उषाराणी देवगुणे, नगरपालिका विभागाचे डी पी ओ बाविस्कर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Monday, 20 May 2013

जळगांव जिल्हयात जिल्हास्तर क्रीडा शाळा सुरु करण्याचे आवाहन



          जळगांव, दि. 20 :- ग्रामीण भागातील क्रीडा नैपुण्यप्राप्‍त खेळाडूंना शोधून ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टीने त्याच्या क्रीडा कौशल्याचा विकास साधणे करिता अशा क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शाळांमध्ये प्रवेशित करणेसाठी शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हयात जिल्हास्तर क्रीडा शाळा (District Level Sports School - DLSS) येत्या 4-5 वर्षात स्थापन करावयाची आहे. त्याचबरोबर भारतात राज्यस्तरावर  25 उच्च कार्यमान केंद्र (High Performance Centres) देखील स्थापन करावयाची आहेत.
           पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान अंतर्गत होणा-या ग्रामीण क्रीडा स्पर्धेमधून युवा क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडू शोधून जिल्हास्तर क्रीडा शाळेमध्ये दाखल करुन व उच्च दर्जाची क्रीडा प्रशिक्षण देवून त्यांना राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे कार्य या शाळांमधून करण्यात येणार आहे.
           जिल्हास्तर क्रीडा शाळांना ॲथलेटिक्स, हॉकी / फुटबॉल, इनडोअर हॉल, टेनिस व्हॉलिबॉल, बास्केटबॉल इ. प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा शाळा कार्यरत करण्याकरिता 10 ते 12 एकर मोकळी जागा आवश्यक आहे.
         क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडूंना अशा शाळांमध्ये प्रवेश देवून खेळाबरोबरच  त्यांच्या शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येणार आहे. जिल्हास्तर क्रीडा शाळा प्रत्येक जिल्हयात सुरु करण्यासाठी पुढील सुविधा असणा-या शाळांचा प्रामुख्याने विचार करण्यात येईल.
          कमीत कमी  10 ते 12 एकर मोकळी जागा, उच्च माध्यमिकपर्यत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या शाळा, मुले / मुली / मुले - मुलींसाठीची शाळा , वसतीगृह सुविधा – कमीत कमी 1000 विदयार्थी राहू शकतील ( मुले व मुली ) वरील सुविधा असणा-या या शासकीय शाळा / संस्था / महनगरपालिकेच्या शाळा / जि.प. शाळा अर्ज करणेस पात्र असतील.
        तरी जळगांव जिल्हयातील ज्या शाळा / संस्थांना शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी दि 23 मे 2013 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन आवश्यक त्या कागदपत्रांची  पूर्तता करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.